ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

क्रिकेट

नेवासा – नेवासा येथील तारापार्क सोसायटी मध्ये राहत असलेल्या व इयत्ता ५ वी मध्ये शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकल्यानी आई ,वडील,आजी ,आजोबा, आणि लाडक्या मामा कडून चॉकलेट साठी घेतलेल्या पैशातून आणि घरातील मनी बँक मधील साठवलेल्या रक्कमेतून चक्क तारापार्क येथे क्रिकेट ग्राऊंड बनवल्याने या चिमुरड्यानी केलेल्या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे

हे ग्राऊंड सुरू असताना या बाल गोपाळाची पळ पळ पाहून याचं ठिकाणचे रहिवाशी असलेले आमदार शंकरराव गडाख यांचे माजी स्विय सहायक पि. आर. जाधव हे मदतीला धावून आले आणि यथाशक्ती नुसार ग्राउंड बनवण्यासाठी सहकार्य केले व त्यांना योग्य मार्गदर्शन देखील त्यांनी केले तारापार्क येथील प्रेम तमनर, वरद जाधव, शिवम काळे, सार्थक तमनर, स्वप्नील पुंड, मन्न चौघुले, व पवन तमनर यांनी हे ग्राऊंड उभे करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

या ठिकाणी १ क्रिकेट नेट, १क्रिकेट म्याट, ६ मोठे खांब,स्वछता, व सुसज्ज असे भव्यदिव्य ग्राऊंडचे पाहून परिसरातील अनेकांच्या भुवया उचवल्या आहे आयुष्यात ठरवले तर लहान मोठे अस काही नसतं जिद्द व मेहनत घेत या चिमुकल्यानी दाखवून दिले आहे.

या सगळ्या बालगोपालाची शाळा ग्राऊंड वर भरलेली असता त्याची कुजबुज पहाता परिसरातील काही पालक त्याच्या या आनंदात सहभागी झाले आणि बघता बघता हे ग्राऊंड बनवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले त्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात न मावणारा असल्याचे तेथील नागरिकांनी यावेळी सांगितले.

आपल्या मुलांना ज्या गोष्टीत आनंद वाटतो ते त्यांना प्रथम करून घ्यावे त्याच्यात जे कलागुण आहे ज्या क्षेत्रात टॅलेंट आहे ते क्षेत्र आपण त्यांना दिलं पाहिजे जेणेकरून त्याचं भविष्य उजवलं होईल या ग्राऊंड साठी माझ्या नातवाने जे कष्ट घेतले ते शब्दात वर्णन करणे अवघड आहे.
– पि.आर. जाधव, पालक.

newasa news online
क्रिकेट

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रिकेट
क्रिकेट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रिकेट
Share the Post:
error: Content is protected !!