ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

एसटी

एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोर स्टॉप घेत असताना अचानक या विद्यार्थीनीच्या पायाखालील एसटीचा पत्रा सरकला आणि ती थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली.

Maharashtra News : एसटी महामंडळाची बस पत्रा उघडा असतानाही रस्त्यावरून सुसाट चालली असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा मुद्दा थेट विधानसभेतही पोहोचला होता. या व्हिडिओची चर्चा महाराष्ट्रभर झाली, असाच काहीसा प्रकार कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घडला आहे. असुर्ले पोर्ले इथल्या हायस्कूलमध्ये शिकणारी मुलगी या बसने प्रवास करत होती. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची बस क्रमांक MH 07 C 7990 ही बस पन्हाळ्याहून असुर्ले पोर्ले दरम्यान धावत होती. आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल आसुर्ले पोर्लेची विद्यार्थिनी शुभश्री लहू पाटील ही पन्हाळ्याहून या बसमध्ये शाळेत जाण्यासाठी बसली.

एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोर स्टॉप घेत असताना अचानक या विद्यार्थीनीच्या पायाखालील एसटीचा पत्रा सरकला आणि ती थेट एसटीच्या इंजिनमध्ये अडकली. आज सकाळी 10 च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. शुभश्री लहू पाटील वय 14 राहणार उत्तुरे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर ही विद्यार्थिनी यात जखमी झाली आहे, तिच्या गुडघ्याला जबर मार लागला आहे. अपघात झाल्यानंतर शाळेतील शिक्षक, जीवन खवरे, विकास खोत, शिक्षिका दिपाली मोरे यांनी तिला तातडीने पन्हाळा रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या बसचे चालक म्हणून जयसिंग भीमराव पाटील हे काम पाहत होते, तर वाहक म्हणून संदीप विष्णू गायकवाड वय 37 होते. अस्लम इस्माईल शेख हे वाहतूक नियंत्रक म्हणून काम पाहत आहेत. या घटनेची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसटीतून प्रवास करणारे विद्यार्थी जर पत्रा सरकल्याने एसटीच्या मधून थेट इंजिनमध्ये जाणार असतील तर सामान्यांनी जगाव का मरावं? असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकाराने पन्हाळा परिसरात संतापाची लाट उसळली असून, एसटी महामंडळचा कारभारावरही रोष व्यक्त करण्यात येत आहे.

एसटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एसटी
एसटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एसटी
Share the Post:
error: Content is protected !!