ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रयत

नेवासा – रयत शिक्षण संस्थेमध्ये 35 वर्षे काम करत असताना प्राचार्य श्री.चंद्रकांत कदम यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. श्री. जे. के. बापू जाधव यांनी केले. म्हैसाळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री.चंद्रकांत कदम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. जे. के. बापू जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲड. श्री. अजितदादा सूर्यवंशी होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे माजी सहसचिव विलासराव महाडिक, विभागीय अधिकारी विनयकुमार हणशी , सहाय्यक विभाग अधिकारी अँथोनी डिसोझा माजी सहाय्यक विभागीय अधिकारी श्री.युवराज सावंत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जे. के. बापू जाधव म्हणाले की,प्राचार्य कदम यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले.रयत शिक्षण संस्थेत अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. श्री. अजितदादा सूर्यवंशी म्हणाले की, रयत शिक्षण संस्था ही खऱ्या अर्थाने सेवक चालवितात आम्ही सदस्य नाममात्र आहोत. त्यांच्या बळावरच संस्थेची भौतीक प्रगती व‌ शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे.अशा सेवकांना आम्ही सेवानिवृत्त होऊ देत नाही तर त्यांचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करून घेत असतो.

कदम सरांनी आता परत एकदा रयतेच्या कामात सहभागी व्हावे..”असे आवाहन शेवटी अजितराव सूर्यवंशी यांनी केले.यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. चंद्रकांत कदम सर म्हणाले” माझ्या ३५वर्षे प्रदिर्घ सेवेत संस्था चालक, सल्लागार समिती,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यामुळे शाखेची भौतिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता आला .प्रामुख्याने म्हैसाळ येथे प्राचार्य म्हणून प्रदिर्घ सेवा करता आली..या सेवा‌काळात अनेक कठिण समस्यांना तोंड देत सर्वांच्या सहकार्याने काम करता आले.याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले.

याप्रसंगी विलासराव महाडिक, विनयकुमार हणशी , अँथोनी डिसोझा,माजी प्राचार्य युवराज सावंत, प्रा.बाळासाहेब कनके, प्रा.संजय पाटील, प्रा.संजय दबडे, कु. वेदिका माळी यांनी प्राचार्य कदम यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व स्वागत श्री.संदिप जावळे यांनी केले तर सुत्रसंचालन कुमार कोळी यांनी केले आभार श्रीमती एस.आय.ऐवळे यांनी केले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री. संजय लादे ,सल्लागार समिती चे सदस्य श्री.मनोज जाधव, अजित कबुरे,शांतीनाथ हंजी,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नारायण खरात,शशिकांत माणकापुरे,आजी माजी विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रयत
रयत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रयत
रयत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रयत
Share the Post:
error: Content is protected !!