ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

विश्व हिंदू परिषद

नेवासा – विश्व हिंदू परिषदेच्या नेवासा प्रखंडच्या वतीने गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते शुक्रवारी दि.२ फेब्रुवारी रोजी नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे कारसेवकांचा सन्मान सोहळयाचे आयोजन दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे. श्री क्षेत्र देवगड येथील कल्याण सभामंडपात हा सन्मान सोहळा विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते होणार आहे.

अयोध्या मंदिर निर्माण कार्यात कारसेवक म्हणून सेवा देणाऱ्या कारसेवकांचा समावेश या सोहळयामध्ये रहाणार आहे.या सोहळयासाठी सदगुरू नारायणगिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या समवेत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकरजी गायकर यांची प्रमुख उपस्थिती या सोहळयासाठी रहाणार आहे. या सोहळयासाठी अक्षदा वाटप प्रमुख सर्व राम भक्तांसह सकल हिंदू समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद नेवासा प्रखंड यांनी केले आहे.

newasa news online
विश्व हिंदू परिषद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विश्व हिंदू परिषद
विश्व हिंदू परिषद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विश्व हिंदू परिषद
Share the Post:
error: Content is protected !!