ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निधी

नेवासा – व्यक्तिद्वेशाच्या घाणेरड्या राजकारणावर स्वार्थाची पोळी भाजण्याची विरोधकांची नेहमीची कार्यशैली असली तरी आपण मात्र विकास कामातून त्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी केले. आ.गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून 30 लाख 31 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नेवासा बुद्रुकच्या माकोटा वस्तीवरील सिंगल फेज रोहित्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नेवासा बुद्रुक ग्रामस्थांनी आ.गडाख यांचा सत्कार केला.

यावेळी उपस्थितांसमोर बोलताना आ.गडाख यांनी, 2009 ते 2014 या कालावधीत 958 ट्रान्सफॉर्मर आपण तालुक्यात बसवून अनेक नवीन वीज उपकेंद्रे उभारल्याकडे लक्ष वेधले. नेवासा बुद्रुकच्या माकोटा वस्तीवरील 30 ग्राहकांकरिता ३०.३१ लाख रुपये खर्च करून नवीन सिंगल फेज रोहित्र बसविल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाट पाणी व वीज या दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी शासनाकडून अनेक मंजुऱ्या मिळवल्याचे त्यांनी नमूद करून मुळा धरणाच्या कॅनॉलसाठी 70 कोटी रुपये खर्चाला मंजुरी मिळवल्याचे त्यांनी सांगितले.

वीजेच्या बाबतीत 70 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्यामध्ये घोगरगाव, धनगरवाडी वीज उपकेंद्राचे काम मंजूर करून घेतल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. विकासाच्या बाबतीत रेटून काम करणार असल्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार करून नेवासा बुद्रुक येथील अनेक रस्त्यांच्या खडीकरण, मुरमीकरणाची कामे केल्याचे स्पष्ट करून नेवासा बुद्रुक-बहिरवाडी रस्ता कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लक्ष्मी माता मंदिर, खंडोबा मंदिर सभा मंडपासाठी 15 लाख रुपयांचा निधी दिल्याचेही आ.गडाख यांनी सांगितले.

राजकारण म्हणजे संघर्ष असतो, संघर्ष विसरून पुढे गेले पाहिजे, संघर्ष कमी करा, आम्ही जे काम करतो त्याचाच खरा आनंद मग आम्हाला मिळतो व नवीन प्रश्न सुटण्यास मदत होते असे आवाहन आ.गडाख यांनी यावेळी केले. नेवासा बुद्रुक हे पूर्ण मतदार संघातील क्रांतिकारक गाव असल्याचा विशेष उल्लेख आ.गडाख यांनी केला. यावेळी भूषण शिंदे, अण्णाभाऊ पेचे, प्रकाश सोनटक्के, सर्जेराव चव्हाण यांची भाषणे झाली. याप्रसंगी माकोटा वस्ती,नेवासा बु,नेवासा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेवासा बुद्रुक येथील माकोटा वस्ती येथे आ शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नामधुन सिंगल फ़ेज़ लाइट आम्हाला मिळाली,त्याबद्दल आ.शंकरराव गडाख यांचे माकोटा वस्ती व परिसराच्या वतीने आभार.
– अशोक मारकळी, माकोटा वस्ती नेवासा बुद्रुक.

निधी
निधी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निधी
निधी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निधी
Share the Post:
error: Content is protected !!