ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर महाविद्यालय

श्रम संस्कार शिबिरातून मिळालेल्या शिदोरीचा जीवनात अवलंब करा – महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज

नेवासा – नेवासा तालुक्यातील स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थान हंडीनिमगाव  या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या  राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिराची देवस्थानचे महंत रमेशनंदगिरीजी महाराज प्रमुख उपस्थितीत उत्साहात सांगता करण्यात आली. सात दिवशीय श्रम संस्कार शिबिरातून मिळालेल्या शिदोरीचा विद्यार्थ्यांनी जीवनात अवलंब करा असे आवाहन त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले . शिबीराच्या सांगता प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब साळुंके हे होते यावेळी  श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नवनाथ आगळे यांनी सात दिवस राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल यावेळी सादर केला.

या प्रसंगी जनार्धन पटारे, हंडीनिमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव,सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ,बाळासाहेब साळुंके,होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे,शशिकांत मतकर,नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, देवस्थान सेवेकरी मनुभाऊ जाधव,गोरखभाऊ गुंजाळ, करमचंद पटेल, मुरलीधर जाधव,दत्तात्रय पिसाळ, सोपान पिसाळ,प्रा. अजय पाटील,प्रा.इनामदार,गोविंद गवळी यावेळी उपस्थित होते.
   यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सात दिवस चाललेल्या शिबिराच्या विषयी विद्यार्थी  कु.कोमल औटे,
कु. वैष्णवी तोडमल, वैभव यांनी शिबिरातील अनुभव व त्यातून मिळालेले समाधान याविषयी मनोगत व्यक्त केले.यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भगवे वस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलतांना महंत रमेशानंदगिरीजी महाराज म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व विद्यार्थ्यांनी सात दिवस श्रम संस्कार शिबिरात श्रमदान करून सर्व परिसर स्वच्छ केला यातून त्यांनी काम करतांना कोणतीही लाज बाळगायची नाही ही शिकवण मिळाली.इंग्रजी भाषा ही आपल्या उन्नतीसाठी आत्मसात करायची आहे मात्र मराठी मातृ भाषेला कधी ही विसरू नका तिच्यावर प्रेम करायला शिका असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश गारुळे यांनी केले व तर श्री ज्ञानेश्वर  महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.कार्तिकी नांगरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

ज्ञानेश्वर महाविद्यालय
ज्ञानेश्वर महाविद्यालय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर महाविद्यालय
ज्ञानेश्वर महाविद्यालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर महाविद्यालय
Share the Post:
error: Content is protected !!