ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खते
खते

नेवासा – तालुक्यातील बकूपिंपळगाव येथे बँक ऑफ बडोदा शाखा प्रवरासंगम व महाराष्ट्र शासनाचे कृषी खाते तसेच कृषी विज्ञान केंद्र दहिगावने यांच्या संयुक्त विद्यमाने”विद्राव्य जिवाणू खतांचा” वापर यासंबंधीचे प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोक ढगे म्हणाले की शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी व पिकांच्या अधिक उत्पादनासाठी प्रत्येक पिकासाठी जिवाणू खतांचा वापर करावा.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय व रासायनिक खताबरोबर जिवाणू खतांचा वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन अमलात आणावे जिवाणू खत स्वस्त व हाताळण्यास सोपी व जमिनीची भूक भागविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत उपयुक्त जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढविण्यासाठी जिवाणू खते मदत करतात त्यामुळे सेंद्रिय खतांचे कुजविण्याचे कार्य व रासायनिक खतांचे रूपांतरित करण्याचे कार्य कार्यक्षम होते जिवाणू खतांचा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर ढगे यांनी केले.बँक ऑफ बडोदा शाखा प्रवरासंगम यांचे शाखा व्यवस्थापक जयदीप शेळके यांनी कृषी विज्ञान केंद्राकडून जिवाणू खते विकत घेऊन शेतकऱ्यांना मोफत वाटप केले.

खते

शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव मते होते. याप्रसंगी विद्राव्य जिवाणू खतांचा वापर करण्यासंबंधात प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.शामसुंदर कौशिक यांनी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचे तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.प्रशिक्षण कार्यक्रमाला दगडू बाचकर, संभाजी कुतळ, बापू मते, रामचंद्र मोरे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत पाटील, कृषी सहाय्यक काकडे, वीर, प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.माणिक लाखे यांनी विद्राव्य जिवाणू खतांचा वापर करण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण सुडके यांनी करून सर्वांचे आभार मानले.

newasa news online
खते

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खते
खते

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खते
Share the Post:
error: Content is protected !!