ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नगरपंचायत

नेवासा – नगरपंचायतला वेळोवेळी निवेदने देऊन सुध्दा शहरातील कचरा व पाणी पुरवठा कडे दुर्लक्ष करून शहराला पंधरा ते वीस दिवसांतुन एकदाच पाणी पुरवठा केला जातो आणि ते पण पाणी पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त असे घाण अयोग्य पाणी पिण्यासाठी ते पण पंधरा ते वीस दिवसांतुन एकदाच होत आहे.शहरातील घनकचरा व शहरातील कचरा आणि घाण लवकर उचलली जात नसुन घराघरात असलेल्या घाण कचऱ्यामुळे घराघरात दुर्गंधी पसरली आहे.

या मुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.त्या मुळे संतापलेल्या नागरीकांना सोबत घेऊन मी नेवासकर सामाजिक संघटनेच्या वतीने शांताराम गायके ,डॉ. करणसिंह घुले ,विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा नगरपंचायत व प्रशासनाच्या विरोधात दहावा करुन निषेध व्यक्त केला या वेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब पाटील,रम्हुशेठ पठाण, राजेंद्र मापारी, अम्रुत फिरोदिया,महेश पंडुरे,मिलिंद नागे, राजु पवार,शिवाजी गायकवाड, चंदू घोडके ,बबलू शेख, शशी मावसकर, मनेष चव्हाण ,संदिप चव्हाण ,आकाश चव्हाण ,प्रकाश चव्हाण, गौरव चव्हाण आदी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपंचायत
newasa news online
नगरपंचायत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नगरपंचायत
नगरपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नगरपंचायत
Share the Post:
error: Content is protected !!