ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाजप

सोनई – गेवराई ता नेवासा येथील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते सेवा सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी गुंजाळ, विष्णू कुसळकर,जालिंदर गुंजाळ,गोरक्षनाथ गुंजाळ,गणेश धनवटे,राकेश धनवटे,विलास काळे,अविनाश बर्वे, अंकुश लाडझरे, मधुकर बर्वे,सचिन धोत्रे,जालिंदर सोनकांबळे,सुदाम धनवटे,प्रसादलालझरे,कार्तिक गुंजाळ,कैलास बर्वे,मिलिंद लालझरे यांनी एकत्रित भाजपाला राम राम करत आ शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. याप्रसंगी गेवराई येथील शिवाजी गुंजाळ म्हणाले की नेवासा तालुक्यासह कुकाना जिल्हा परिषद गटात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे काम निष्ठावंतपणे करून पक्ष वाढीसाठी स्वतः कष्ट घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो.

परंतु नेवासा तालुक्यातील स्थानिक भाजप नेतृत्व तू मोठा की मी मोठा यातच अडकले असून यात मूळ भाजप व प्रामाणिक कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना पक्षात स्थान राहिले नसल्याने गेवराई व परिसरातील विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असणारे आ शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गुंजाळ व उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले. गेवराई येथील कार्यकर्त्यांचे आ शंकरराव गडाख यांनी स्वागत केले व म्हणाले गेवराई व परिसरात सर्वाना सोबत घेऊन काम करण्यासाठी प्रयत्नशील राहू. याप्रसंगी प्रवीण गडाख,त्रिंबक सतरकर गुरुजी,शंकरराव खाटीक,वेणूनाथ पाटेकर
आदी उपस्थित होते.

भाजप

एकाच आठवड्यात चिंचबन,जेऊर हैबती पाठोपाठ गेवराई मधील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी
दिल्याने नेवासा भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

भाजप
भाजप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाजप
भाजप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाजप
Share the Post:
error: Content is protected !!