ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सदाशिवनगर

नेवासा – नेवासा शहरातील सदाशिवनगर विवेकानंदनगर प्रभागात अनेक महिन्यापासून पिण्यासाठी खराब पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आहे यासाठी या भागातील  महिलांनी एकत्रित येत आपला मोर्चा नगरपंचायतकडे वळवून नगरपंचायत प्रशासनाला  निवेदन देऊन जाब विचारला आक्रमक होऊन त्यांनी अनेक  समस्या यावेळी मांडल्या.

सदाशिवनगर

      नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील सदाशिवनगर व  विवेकानंदनगर काॅलनी व परिसरातील नळाला काही दिवसांपासून खराब पिण्याचे पाणी येत आहे,त्यामुळे अनेकांना पोटदुखी सारखे आजार उदभवले आहे  याच्या निषेधार्थ महिलांनी नगरपंचायतला चांगलेच धाऱ्यावर धरले.यावेळी वरील प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.हर्षा पोतदार,प्रतिभा घोडके,रश्मी चानन, चंचल विखोना,जीत चानन,दीपा चानन,शोभा शिंदे गीता अरोडा,अंजली कुलकर्णी,जयश्री कुलकर्णी व  परिसरातील महिला उपस्थित होत्या.

     मागण्याचे  निवेदन नेवासा नगरपंचायत प्रशासनाला दिले पुढील आठ दिवसात स्वच्छ पाण्याचे नियोजन न झाल्यास आणि वेळेवर स्वच्छ पाणी पुरवठा  न केल्यास तसेच कचरा व्यवस्थापन न झाल्यास नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सौ हर्षा पोतदार यांनी  दिला आहे.

सदाशिवनगर
सदाशिवनगर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सदाशिवनगर
सदाशिवनगर
सदाशिवनगर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सदाशिवनगर
Share the Post:
error: Content is protected !!