ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मोहिनीराज

नेवासा : नेवासकरांनी यात्रोत्सव आनंदाने साजरा करावा तसेच यात्रेत येणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही व यात्रा उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी ड्रोनने निगराणी ठेवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले.ग्रामदैवत श्री.मोहिनीराज यात्रा उत्सव निमित्ताने नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यात्रा काळातील भळंद,पाच दिवस महाप्रसाद पंगत,पालखी व झेंडा मिरवणुका, काल्याच्या दिवशी बंदोबस्त ठेवणे तसेच यात्रा निमित्त स्वच्छता,लाईट व्यवस्था,दुकाने,रहाट पाळणा परिसरात सीसीटीव्ही बसविणे,तक्रार कक्ष उभारणे,आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

मोहिनीराज

यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव म्हणाले की ग्रामदैवत श्री मोहनीराज महाराज यात्रा उत्सव कालावधीत उलटबाजी व टगेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जाईल. महिलांना यात्रेत सुरक्षित खरेदी करता येईल यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यात्रा उत्सव वाढीसाठी नेवासा शहर व परिसरातील नागरिक व तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. यावेळी यात्रा कमिटी सदस्य,शहरातील व्यापारी,माजी नगरसेवक व पुरुष भाविक,ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते, देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

newasa news online
मोहिनीराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोहिनीराज
मोहिनीराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोहिनीराज
Share the Post:
error: Content is protected !!