ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मिशन आपुलकी

भालगाव – जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करणारी केंद्र असून उद्याचे सुजाण नागरिक घडविणारे ज्ञान मंदिरे आहेत.मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत शाळेच्या भौतिक सुविधांसाठी पालकांनी, शाळेच्या माजी विद्यार्थी, दानशूर ग्रामस्थ आदींनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सरस्वती लोंढे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जिल्हा परिषद अहमदनगर च्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत वर्गशिक्षिका शितल झरेकर यांनी पुढाकार घेत इयत्ता दुसरीच्या सुरू असलेल्या स्मार्ट क्लास ची पाहणी यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष रवींद्र आहेर, सदस्य अयोध्या तनपुरे, रेखा कोरडे, सुवर्णा काळे ,सतिष निमसे आदींनी केली.
वर्ग शिक्षिका झरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करत शाळेमध्ये साकारण्यात येणाऱ्या डिझिटल टू स्मार्ट क्लास ही संकल्पना पालकांसमोर जून महिन्यात पालक सभेत मांडली.

मिशन आपुलकी

त्यानुसार आज अखेर वर्गास मार्बोनाईट फरशी बसविणे,खिडकी ग्रॅनाइट व दुरुस्ती,लाईट फिटिंग, दरवाजा दुरुस्ती,आतील बाजूस रंगकाम करणे,व्हाईट बोर्ड अशा विविध झालेल्या कामांचा आढावा सांगितला.सोशल मीडिया द्वारे आवाहन करत तसेच पालकांनी एकत्र येत आज अखेर पस्तीस हजार रुपये लोकसहभागातून उभारले आहेत.यावेळी पालक रवींद्र आहेर ,अयोध्या तनपुरे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व पालकांनी तसेच सरपंच मंगल खरात,उपसरपंच रंजना आहेर, सर्व सदस्य यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
यापुढील काळात वर्गाच्या आतील बोलक्या भिंती तयार करणे व त्यावर अभ्यासक्रम रंगविणे, डिजिटल शिक्षणासाठी सुविधा निर्माण करणे अधिक कामांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची आवाहन यावेळी वर्गशिक्षिका शितल झरेकर यांनी केले.

मिशन आपुलकी
मिशन आपुलकी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मिशन आपुलकी
मिशन आपुलकी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मिशन आपुलकी
Share the Post:
error: Content is protected !!