ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पुण्यतिथी

नेवासा – नेवासा येथील एस.टी.आगारात संत श्री भगवान बाबा व संत श्री वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी संयुक्तरित्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.पुण्यतिथी निमित्ताने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.संत हे सर्व समाजाचे असून अस्थिर झालेल्या समाजाला स्थिर करण्याचे काम संतांनी केले त्यामुळे संत संगतीत राहून आपल्या जीवाचा उद्धार करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. नेवासा येथील एस टी आगारात झालेल्या पुण्यतिथी निमित्त स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी एस टी डेपोच्या वतीने आगारव्यवस्थापक रामनाथ मगर यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले.गोरक्षनाथ आव्हाड व कामगार नेते अनिल टाके यांचा सन्मान स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रम प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप ढाकणे, एस टी डेपोचे आगारव्यवस्थापक रामनाथ मगर,पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे,देवगडचे संतसेवक शुभम महाराज बनकर, बस स्थानक प्रमुख ज्ञानदेव मुरदारे, प्रवाशी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण, वाहतूक नियंत्रक विजय लाड,एस टी बँकेचे संचालक दत्ताभाऊ खेडकर, अनिल टाके,विकास पाटोळे,राजेश भाबड, काका पोटे,

पुण्यतिथी

अनिल जरे,ज्ञानदेव आगळे,राकेश सोनवणे, गोरक्षनाथ आव्हाड,रमेश दाणे, बाळासाहेब पाटोळे,राजेंद्र ठाकूर,वसंत गणगे,चालक पावसे,चालक गर्जे,गणेश नरवडे,राधाकिसन राशीनकर,  जुबेर सय्यद यांच्यासह एस टी डेपोचे चालक,वाहक, कार्यशाळेतील यंत्र कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित चालक वाहक तांत्रिक कामगार प्रवासी यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.वाहतूक नियंत्रक काका पोटे यांनी उपस्थित कामगार,चालक वाहक यांत्रिक कामगार प्रवाशी यांचे आभार मानले.

पुण्यतिथी
पुण्यतिथी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुण्यतिथी
पुण्यतिथी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुण्यतिथी
Share the Post:
error: Content is protected !!