ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ऊस

नेवासा – तालुक्यातील रांजणगाव देवी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यामार्फत ऊस पिक व्यवस्थापन व पाचट शास्त्रीय पद्धतीने नियोजन यावर कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ चौधरी होते. डॉ ढगे म्हणाले की ऊस तुटल्यानंतर एका एकरामध्ये साधारणपणे दोन ते अडीच टन पाचट असते याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करताना पाचट पेटू नये ते शेतामध्ये एकसारखे पसरून वाळू द्यावे म्हणजे त्याचे व्यवस्थापन करणे सोपे जाते पाचट कुट्टी मशीनच्या साह्याने बारीक तुकडे करावेत.

त्यावर कुजविण्यासाठी एकरी एक पोती युरिया व एक गोणी सुपर फॉस्फेट टाकावे महत्त्वाचे एकरी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू कल्चर टाकावे त्यामुळे जमिनीला सेंद्रिय कर्ब मिळतो जमिनीचा सामू उदासीन होतो तसेच खताच्या खर्चात व पाण्याची यामध्ये बचत होते यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते जमिनीत हवा खेळती राहिल्यामुळे भुसभुशीतपणा येतो मुळे अन्न व हवा पाणी घेऊ शकतात याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या मंडल कृषी अधिकारी सौ वृषाली पाटील यांनी कृषी खात्याच्या ,”मागेल त्याला शेततळे व मागील त्याला ठिबक संच”””या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

ऊस

कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ चौधरी रामभाऊ चौधरी राहुल पेहरे भगवान काळे ज्ञानेश्वर काळे ज्ञानेश्वर चौधरी सोपान गोरे भाऊसाहेब चौधरी शिवाजी गोरे बाबासाहेब गोरे राजेंद्र चौधरी उपस्थित होते. व्यासपीठावर ज्ञानेश्वर 16 या उसाच्या जातीचे जनक प्रगतशील शेतकरी विश्वनाथ चव्हाण व खेडले काजळीच्या माजी सरपंच सौ निर्मलाताई ढगे पाटील हजर होत्या. कृषी सहाय्यक भीम भाऊ गायकवाड यांनी सांगितले की नवीन उसामध्ये तसेच खोडवा तुटून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी मिश्र पीक हरभरा घ्यावा हरभऱ्याची विशाल जात चांगली उत्पादन देते कृषी सहाय्यक राहुल ठोंबरे यांनी सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

ऊस
ऊस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ऊस
ऊस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ऊस
Share the Post:
error: Content is protected !!