ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

यशोरंग

उदयन गडाखांच्या संकल्पनेतून 5 दिवशीय यशोरंग उत्साहात संपन्न.

सोनई – नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त सोनईत संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईत 31 जाने 2024 ते 4 फेब्रु 2024 या 5 दिवसांच्या कालावधीत संस्था वर्धापनदिन, यश अकॅडमी ,मुळा पब्लिक स्कुल,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,कृषी महाविद्यालय,कॉलेज ऑफ फार्मसी यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वचा विकास व्हावा यासाठी राज्यभरातुन नामवंत वक्ते विद्यार्थ्यांच्या भेटीला बोलावले होते.

यामध्ये चला हवा येऊ द्या फेम डॉ निलेश साबळे, लेखक अरविंद जगताप, कवी गणेश शिंदे, जेष्ठ पत्रकार सुधीर लंके,राष्ट्रपती पदक विजेते पो निरीक्षक गौतम पटारे यांचा समावेश होता उपस्थित वक्त्यांनी जीवनाला कसे सामोरे जावे याविषयी विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भरगच्च संस्कृतीक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकपात्री प्रयोगापासून ते लावणी व थेट फॅशन शो पर्यत विद्यार्थ्यांना कलागुण सादर करून उपस्थितांची वहवा मिळवली. फावल्या वेळात विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ चाखता यावेत यासाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टोल उभारण्यात आले होते. त्यासही विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला. वर्षभरात विविध क्षेत्रात राज्यपातळीवर, राष्ट्रीय नैपुण्य मिळवलेले संस्थेचे विद्यार्थी, खेळाडू,शिक्षक यांचा विशेष सन्मान करून कौतुकाची थाप देण्यात आली.

तसेच संस्थेच्या सर्व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावाही याप्रसंगी संपन्न झाला यामुळे माजी विद्यार्थी मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दि स्टेट बस ग्रुप लाइव्ह कॉन्सर्ट व फटाक्यांच्या अतिषबाजीचा विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून सोनईत 5 दिवस अखंड सुरू असलेल्या यशोरंग कार्यक्रमामुळे सोनई व परिसराला मोठी संस्कृतीक पर्वणी लाभली. हजारो विद्यार्थी, पालक, परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उदयन गडाख यांच्या कल्पक नियोजनाचे कौतुक केले.

यशोरंग

मुळा एज्युकेशन सोसा सोनईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यक्तिमव विकासाचे धडे मिळावे व या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांचा सहभाग लाभावा व विद्यार्थी व पालकांना संस्कृतीक वातावरण आपल्या परिसरात अनुभवता यावे यासाठी सोनईत 5 दिवशीय यशोरंग कार्यक्रमाचे आयोजन केले यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
– उदयन गडाख, उपाध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी , सोनई.

यशोरंग
यशोरंग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यशोरंग
यशोरंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यशोरंग
Share the Post:
error: Content is protected !!