ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गोगलगाव

नेवासा – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालय गोगलगाव येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका श्रीमती काळे टी.बी. यांनी विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. किशोर वयात मुलींमध्ये शारीरिक व मानसिक होणारे बदल तसेच घ्यावयाची काळजी याविषयी श्रीमती काळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती महाजन बी.एस.उपस्थित होत्या.

तसेच दुसऱ्या सत्रात आयुष्यमान आरोग्य मंदिर गोगलगाव चे सी.एच.ओ. डॉ. कुंदे वाय आर. यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा, मधुमेह व डोळ्यांचे विकार, यासारख्या शारीरिक आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शनपर केले. गोगलगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक डॉ.कणसे यांनी विद्यार्थ्यांना पोटातील होणारे जंतू व त्यावर घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी आरोग्य सेविका श्रीमती काळे टी.बी.,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी.एस.महाजन व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव गरड यांनी तर आभार नानासाहेब घुले यांनी मानले.

गोगलगाव
गोगलगाव
गोगलगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोगलगाव
गोगलगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोगलगाव
Share the Post:
error: Content is protected !!