ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वैद्यकीय

सोनई – सोनई ता नेवासा येथील इंदू आयुर्वेदिक चिकित्सालयाचे उद्घाटन आ शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले सोनईसह परिसरात डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेक रुग्णांची सेवा करत जीवदान दिले आहे. रुग्ण सेवा करतांना डॉक्टर बंधू, भगिनी स्वतःच्या कुटूंबाला सुद्धा वेळ देऊ शकत नाहीत. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे डॉक्टर हे समाजचे खरे आयडॉल आहेत निरोगी व आरोग्यमय समाजासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.

नव्याने वैद्यकीय व्यवसायात आलेल्या तरुणांनी जुन्या पिढीचा वारसा घेऊन समाजासाठी काम करावे समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. सोनईत रुग्ण सेवेत नव्याने दाखल झालेल्या इंदू क्लिनिकला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विश्वासराव गडाख,दिलीपराव पवार,भाऊसाहेब निमसे,दिलीपराव लोखंडे,बद्रीनाथ खंडागळे,कानिफनाथ येळवंडे,ज्ञानेश्वर बोरुडे,एकनाथ दरंदले, रघुनाथ पानगव्हाणे, अंबादास राऊत,दादासाहेब वैरागर, आदींसह सोनई व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत डॉ ऋषिकेश दारकुंडे, इंजि प्रशांत दारकुंडे यांनी केली. आभार प्रा सुभाष दारकुंडे व इंदुमती दारकुंडे यांनी मानले.

वैद्यकीय
वैद्यकीय
वैद्यकीय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वैद्यकीय
वैद्यकीय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वैद्यकीय
Share the Post:
error: Content is protected !!