ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

कृषी

संघटनेचे व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते देणार जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना भेटी

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील चार ही महसूल मंडळातील शेतकरी आज शुक्रवारी रोजी शेतकरी संघटनेच्या व प्रहार संघटनेच्या माध्यमातून पीक विमा परताव्या पासून वंचित राहिलो ,त्या संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना समक्ष भेटून चर्चा करण्यात येणार असल्याने शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, युवा आघाडी शेतकरी संघटना डॉ रोहित कुलकर्णी व प्रहार जन शक्तीचे जिल्हाअध्यक्ष अभिजित पोटे यांनी चार ही वंचित राहिलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

नेवासा बु ,सोनई , चांदा, घोडेगाव ह्या चार महसुली मंडळांमध्ये पंतप्रधान पिक विमा योजना खरीप २०२३ चा २५ टक्के अग्रीम व उर्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही . तसेच ज्या मंडळांचा २५ % अग्रिम पिक विमा मिळाला त्याची उर्वरित रक्कम मिळ्ण्याची चिन्हे आज तगायत दिसून येत नाही. त्यामध्ये मुख्यतः सोयाबीन, कपाशी, तूर ,भुईमुग ह्या पिकांचा समावेश आहे . ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी कडून तांत्रिक अडचणी दाखवून विमा नाकारण्यात आला आहे . कृषि विभाग,तहसील तथा जिल्हाधिकारी कार्यालय हे देखील अधिसूचना काढण्यात दिरंगाई करीत आहेत .

कृषी

ह्या सर्व परिस्थितीची गंभीर दखल नेवासा तालुका शेतकरी संघटना आणि प्रहार जन शक्ती पक्षाने व शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी रोजी सकाळी ११वाजेच्या सुमारास भेटणार आहेत. त्यामध्ये चार ही महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शेतकरी संघटना व प्रहार जन शक्ती पक्षाने करण्यात येत आहे .

कृषी
कृषी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी
Share the Post:
error: Content is protected !!