ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निवडणुका

नेवासा : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घ्या,ही मराठी हिंदी पत्रकाराची मागणी आहे संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्षसुधाकर होंडे यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे निवेदन पाठवून केली आहे. निवेदनात होंडे यांनी म्हटलेआहे की, सध्या आपणाकडून लोकसभा, विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे दिसून आले आहे. परंतु तत्पूर्वी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद,पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याची बाब आपल्यानिदर्शनास आणून देत आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मुदत संपून प्रशासक राजला वारंवार मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवली आहे. ग्रामीणविकासाची मुख्य यंत्रणा समजल्या जाणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाकडून कारभार चालविला जाण्याऐवजीप्रशासकामार्फत चालविला जात असल्याने विकास प्रक्रियेला प्रचंड मर्यादा पडून ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे. निवडणूक प्रक्रियेअभावी महाराष्ट्रातील ग्रामीण विकास प्रक्रिया ठप्प झालेली असताना ती राबविण्याला प्राधान्य देण्याऐवजी लोकसभा, विधानसभानिवडणूक प्रक्रिया राबविणे संयुक्तिक वाटत नाही.

निवडणुका
newasa news online
निवडणुका

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निवडणुका
निवडणुका

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निवडणुका
Share the Post:
error: Content is protected !!