ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रेल्वे


श्रीरामपूर – रेल्वे लाईनच्या विस्तारामुळे व मालधक्क्याच्या प्रस्तावित स्थलांतरामुळे विस्थापित होऊ पाहणा-या नागरीकांवर अन्याय होऊ नये म्हणून खा.सुजय विखेंच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वेचे केंद्र तसेच सोलापूर विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी सिद्धरमैय्या सालीमठ, वनविभाग अधिकारी यांचेसोबत भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांच्या प्रयत्नाने भाजपचे केतन खोरे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, कामगार नेते नागेश सावंत, आपचे तिलक डुंगरवाल, संजय गांगड यांची ॲानलाईन बैठक पार पडली.

नुकत्याच संपन्न झालेल्या ॲानलाईन बैठकीत दिल्ली येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे व खा.सुजय विखे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.विखे पाटील म्हणाले की, रेल्वे विभागाच्या नोटीसीमुळे श्रीरामपूरातील नागरीक भयभीत झाली होते. हि कारवाई झाल्यास शेकडो नागरीकांची घरे व दुकाने उद्ध्वस्त होण्याची भिती होती. येथील नागरीकांनी महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेतल्याने आपण या प्रकणात लक्ष घातले.

रेल्वे विभागाने मालधक्याच्या जागेचे पुरावे जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडे सादर करावेत त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारची संबंधित विभागांची कमिटी तयार करावी तसेच वनविभाग व खाजगी मालमत्ताधारक यांच्याकडील जागा रेल्वे विभागाची असल्याचे सिद्ध करावे तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अन्यथा कायदेशीर मार्गाने रेल्वे प्रशासनाविरुद्ध कार्यवाही केली जाईल असा इशारा खा.विखेंनी दिला. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे म्हणाले की, खा.सुजय विखे पाटील यांनी मांडलेली बाजू योग्य असून रेल्वे प्रशासनाने जागेची शहानिशा करून कोणीही विस्थापित होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच वन विभाग, महसुल व रेल्वे विभागाच्या अधिका-यांची कमिटी स्थापन करण्याचे आदेश देत या कमिटीचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अशा सुचना रेल्वे विभागाच्या अधिका-यांना दिल्या.

सदर ॲानलाईन बैठकीसाठी खा.सुजय विखे पाटील यांचेकडे भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांनी पाठपुरावा केला. कामगार नेते नागेश सावंत व आपचे तिलक डुंगरवाल यांनी श्रीरामपूरच्या नागरीकांवर रेल्वे प्रशासनाने अन्याय करू नये हि मागणी करत प्रस्तावित मालधक्क्यामुळे अनेक नागरीक विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून देत परिसरात असणा-या शाळा, कॅालेज, हॅास्पीटल व रहिवाशांना मालधक्यावरील सिमेंट धुळीमुळे त्रास होत असल्याने सदर मालधक्का एमआयडिसी किंवा ओव्हर ब्रीज या ठिकाणी हलवावा अशी मागणी केली.

रेल्वे

तर बैठकीत भाजपचे केतन खोरे, संजय गांगड यांनी दत्तनगर हद्द संगमनेर रोड ते ओव्हर ब्रीज नेवासा रोड येथील विस्थापित होऊ शकणा-या नागरीकांच्या बाजूने ठोस भुमिका मांडली. यावेळी विकास डेंगळे, प्रसाद कटके, युवराज घोरपडे, योगेश जाधव, गणेश भडांगे, सुभाष भडांगे, भागवत घुगे, मुबारक शेख, आलिम शेख, हरिश काळे, सुरेंद्र विखे आदी उपस्थित होते.

विखे पिता-पुत्र धावले श्रीरामपूरकरांच्या मदतीला…
रेल्वे प्रशासनाची कारवाई न टाळता येणारी असल्याचे बोलले जात होते. मात्र केंद्र व राज्य सरकारमध्ये दबदबा असलेल्या महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व खा.सुजय विखे पा. यांनी स्वतः लक्ष घालत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे प्रशासन, वनविभाग, महसुल विभागात यशस्वी मध्यस्थी करत रेल्वे लाईनच्या रहिवासी, व्यापा-यांवरील कारवाईची टांगती तलवार दूर केल्याने नागरीकांनी विखे पिता-पुत्रांचे आभार मानले.


…तर रेल्वे प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही – खा.विखे
रेल्वे प्रशासनाने जमिनीची मालकी सिद्ध केल्यावर नागरीकांना नोटीस पाठविणे गरजेचे होते. तसेच जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेसोबत चर्चा करणे गरजेचे होते मात्र रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या भुमिकेमुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे विभागाने सदर जागेचा मालकी हक्क सिद्ध न करता कारवाई केल्यास त्यांचे विरुद्ध कायदेशीर मार्गाने कार्यवाही करू असा इशाराच खा.सुजय विखे पा. यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांपुढे दिल्याने रेल्वे अधिका-यांची चांगलीच तारंबळ उडाली.

newasa news online
रेल्वे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रेल्वे
रेल्वे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रेल्वे
Share the Post:
error: Content is protected !!