ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गौरी देवरे

नेवासा – एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आलेल्या नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम देवरे वस्ती येथील कु.गौरी शंकरराव देवरे हिचा प्रवरासंगम येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सत्काराद्वारे गौरव करण्यात येऊन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
देवगड भक्त परीवाराचे निस्सीम सेवेकरी संतसेवक शंकरराव देवरे सर हे प्रवरासंगम येथील रहिवासी असून पुण्यामध्ये त्यांनी भोसरी येथे मोठी इन्स्टिट्यूट उभी केली आहे,त्यांची कन्या कु. गौरी देवरे हिने शिक्षिका असलेल्या आई व वडिल शंकरराव यांचे मार्गदर्शन घेऊन नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने डे.कलेक्टर या पदासाठी उत्तीर्ण झाली आहे.

धार्मिक संस्कार व परिवारातून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन,अध्ययनासाठी घेतलेले कष्ट यामुळे कु.गौरी हिने हे मोठे यश संत ज्ञानेश्वर माऊलींच्या व संतांच्या या भूमीची शान वाढवली आहे यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कु.गौरी हिच्या निवासस्थानी झालेल्या धार्मिक कार्यक्रम प्रसंगी तिचा शाल बुके,श्रीफळ देऊन विविध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

गौरी देवरे

यावेळी झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी युवा कीर्तनकार हभप शशिकांत महाराज कोरेकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,कु.गौरी यांचे वडील शंकरराव देवरे,आई आदर्श शिक्षिका सौ.मनिषाताई देवरे, चुलते सुखदेव देवरे,ईश्वर देवरे,कैलास देवरे,कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे,प्रवरासंगमचे माजी सरपंच सुनीलराव बाकलीवाल,हिरा पेट्रोलियमचे चालक दिनकरराव कदम, सौ.हिराताई कदम,लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,संतोष काळे सर,शशिकांत मतकर,प्रकाश पांडव,राहुल पाटील, गजानन गवारे,शांतवन खंडागळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरी देवरे
गौरी देवरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गौरी देवरे
गौरी देवरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गौरी देवरे
Share the Post:
error: Content is protected !!