ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

संतपूजन

नेवासा – नेवासा येथील समाजकर्मी कै. जगन्नाथ कडू पाटील यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून कडू पाटील परिवाराच्या वतीने आयोजित संतपूजन व कीर्तन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सोहळयामध्ये सुमारे ७३३ महिलांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाटप करण्यात आले.

संतपूजन

नेवासा येथे झालेल्या कीर्तन व संतपूजन सोहळयाच्या प्रसंगी बीड गेवराई येथील हभप अक्रुर महाराज साखरे यांचे हरि कीर्तन झाले.यावेळी आलेल्या संत महंतांचे संतपूजन सोहळा संयोजक नितीन कडू पाटील व सचिन कडू पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन करण्यात आले तर उपस्थित महिलांना सोहळा संयोजक श्रीमती मंदाताई कडू पाटील,माजी सरपंच सुशिलाताई लोखंडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.उषाताई मोटे, वडाळा बहिरोबा येथील सरपंच सौ.मीनलताई मोटे,सौ. नीता वाघ,सौ.उषाताई जामदार,सौ.सुनीता जामदार, पुष्पाताई विधाटे,शोभाताई जामदार,शांताबाई औताडे, यांच्या हस्ते ७३३ ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात आले.

संतपूजन

यावेळी झालेल्या सोहळयाच्या प्रसंगी सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख हभप उध्दवजी महाराज मंडलिक,संत तुकाराम महाराज मंदिराचे सेवेकरी भागवत कथाकार अंकुश महाराज जगताप,रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात,गहिनीनाथ महाराज आढाव, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, युवा नेते उदयनदादा गडाख, नेवासा बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे, सभापती नंदकुमार पाटील, दिनकरराव गर्जे, इंजिनिअर सुनीलराव वाघ, डॉ.लक्ष्मण खंडाळे, अँड. काकासाहेब गायके, अण्णासाहेब जामदार, वसंतराव जामदार, प्रल्हाद विधाटे, बिट्टूभाऊ लष्करे, बदाम महाराज पठाडे, माजी सरपंच सतीश गायके, निरंजन डहाळे यांनी उपस्थित राहून संतपूजन सोहळयाचे व ग्रंथ वाटप उपक्रमाचे कौतुक केले.

तर संतपूजन सोहळा कमिटीचे साईनाथ लष्करे, ज्ञानेश कोरके, बाबा लष्करे, जालिंदर गवळी, कैलास लष्करे, गोरख घुले, प्रविण जामदार, बालू डांगरे, प्रशांत घुले, प्रीतम साळुंके, सचिन पडूंरे, महेश औताडे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर व भाविकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

संतपूजन

या कार्यक्रम प्रसंगी प्रत्येक संतांचे संतपूजन भगवा टॉवेल व ग्रंथ व श्रीफळ देऊन करण्यात आले. तर प्रत्येक महिला सुवासिनीला येथे ज्ञानेश्वरी जन्माला आली म्हणून त्या ज्ञानेश्वरीचे वाचन होण्याच्या उद्देशाने ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयास कीर्तनकार माऊली कन्या दीपालीताई पुणेकर उपस्थित होत्या तर या सोहळयाच्या झालेल्या कीर्तनात गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली फटांगरे, संतोष महाराज पवार, हरिचंद्र घावटे, मृदुंगाचार्य योगेश महाराज शेजुळ, ऋषि महाराज फटांगरे, अनिल महाराज गरुड, कैलास महाराज, हार्मोनियम वादक पांडुरंग महाराज गणगे यांनी झालेल्या चालीस उत्कृष्ट संगीत साथ दिली.
उपस्थित हजारो भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन कडू पाटील यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.

संतपूजन
संतपूजन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संतपूजन
संतपूजन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संतपूजन
Share the Post:
error: Content is protected !!