ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हंसतीर्थ

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी येथे परमपूज्य अण्णा महाराज यांनी स्थापन केलेले रेणुका माता मंदिरात छत्रपती संभाजीनगर येथील युवा कलावंत डॉ.सुरेश विधाते यांचे व्हायोलिन वादन सकाळच्या मंगल प्रभात समयी त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये व्हायोलीनच्या तारा छेडल्या व आलेल्या रसिक भक्तांना वेगळ्या भावविश्वाची सैर घडवली. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन पंचदिनात्मक पुण्यतिथी उत्सव हा बेल्हेकरवाडी येथे महाराजांची समाधी स्थळी संपन्न होत आहे.

हंसतीर्थ

या कार्यक्रमातच डॉ सुरेश विधाते हे छत्रपती संभाजीनगर येथील कलावंत असून कंठ संगीत.हार्मोनियम. तबला या विषयात त्यांनी अ.भा.गां.महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केलेली आहे.त्याबरोबरच संगीत विषयात डॉक्टरेट ही पदवीही त्यांनी प्राप्त केलेली असून व्हायोलिन या अत्यंत दुर्मिळ वाद्य प्रकारात त्यांनी विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे.छत्रपती संभाजीनगर येथे श्रद्धा संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे प्रचार व प्रसाराचे कार्य ते करत असतात.ग्रीनलँड ग्लोबल स्कूलचे ते संस्थापक संचालक असून शाळेचे प्राचार्य पदाची धुराही सांभाळत आहेत.

श्री गुरुदेव दत्तपीठ श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षी मनोभावे सुरेश विधाते हे आपली कला सादर करत असतात.डॉक्टर सुरेश विधाते यांना तबल्यावर श्री कृष्णकुमार विधाते यांनी साथसंगत केली. व्हायोलिन सचिन पवार उपस्थित सर्व मान्यवर कलावंतांचा सन्मान हा छत्रपती संभाजीनगर येथील परमपूज्य अनिरुद्ध गुरुजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मठाधीश गुरुवर्य यज्ञेश्वर महाराज संस्थांनातील पूजनीय संत महंत भावीक भक्तांची मोठी उपस्थिती होती.

हंसतीर्थ
हंसतीर्थ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हंसतीर्थ
हंसतीर्थ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हंसतीर्थ
Share the Post:
error: Content is protected !!