ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बांधकाम

नेवासा – महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ तर्फे मंडळाकडे नोंदणीत असणाऱ्या बांधकाम कामगारास ३० विविध आकाराची व प्रकाराची स्टीलची भांडी असलेला संच नगर येथील जिल्हा कामगार कार्यालयाकडे उपलब्ध झालेला आहे, अशी माहिती समर्पण फाउंडेशनचे प्रवर्तक व अध्यक्ष डॉ करण सिंह घुले यांनी दिली. समर्पण फाउंडेशन नियमितपणे कामगार विभागाकडे तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे कामगारांच्या हिताच्या योजना कार्यान्वित करण्याकरिता सतत पाठपुरावा करत असते. याच्याच फलस्वरूप आतबट्ट्याची असलेली मध्यान भोजन योजना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बंद करण्यात आली.

बांधकाम

बांधकाम मजुरांच्या संसारात थेट हातभार लावणारी 30 स्टीलच्या भांड्यांचा संच असणारी ही योजना मंडळांनी जानेवारी महिन्यात सुरू केली. कामगारांच्या हिताचा दृष्टिकोन ठेवून राबवलेल्या प्रत्येक योजनेचे समर्पण फाउंडेशन स्वागत करत असते तसेच योजना गोरगरीब व खऱ्या बांधकाम मजुरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत असते. असे डॉ. घुले यांनी स्पष्ट केले. सदर वितरणाची प्रक्रिया ही ऑनलाइन असून पूर्णतः पारदर्शक रीतीने राबवण्याचा जिल्हा कामगार कार्यालयाचा प्रयत्न आहे. नोंदणी जीवित असलेल्या कामगाराने आपला स्वतःचा अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून बोर्डाच्या कार्यालयात द्यावा. त्यासोबत नोंदणी कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स व रेशन कार्डची झेरॉक्स जोडावी. त्यानंतर वितरणासाठीच्या एजन्सी कडून सदर अर्जाची खातरजमा करून लगेचच संचाचे वितरण केले जाईल.

कामगार विभागाकडे राबवलेली ही योजना पूर्णतः मोफत असून एका कुटुंबासाठी फक्त एकच संच देण्यात येणार आहे. बांधकामावर उपजीविका असणाऱ्या व मंडळाकडे नोंदणीत असणाऱ्या सर्व बांधकाम कामगार बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र थोरात यांनी केले आहे.

बांधकाम कामगार महामंडळाकडुन अनेक कल्याणकारी योजना मंडळाकडे नोंदित असलेल्या मजुरांसाठी राबविण्यात येतात. या सर्व योजना मजुरांना मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने हे धोरण तंतोतंत राबविल्या जात आहे. स्टीलच्या भांड्यांचा सेट असो शिष्यवृत्ती असो अथवा विम्याचे प्रकरण असो कुठलेही योजनेसाठी पैसे मागितले जात नाहीत.

अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये मंडळाकडून लाभ मिळवून देण्याचे आम्हीच दाखवत आर्थिक लूट करणाऱ्या एजंटचा सुळसुळाट झाला आहे. जर कुणी व्यक्ती कामगार विभागाच्या नावाखाली एजंट गिरी करताना अथवा गोरगरीब कामगारांकडून पैसे उकळताना आढळला तर त्याच्यावर कार्यालयाच्या वतीने गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

तरी कुठल्याही आमिषाला बांधकाम मजुरांनी बळी पडू नये. थेट जिल्हा कामगार कार्यालयाच्या बांधकाम मजूर बोर्डाकडे संपर्क करून आपल्या योजनांचा मोफत व तत्पर लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त श्री नितीन कवले यांनी केले आहे.

newasa news online
बांधकाम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बांधकाम
बांधकाम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बांधकाम
Share the Post:
error: Content is protected !!