ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उद्धव ठाकरे

नेवासा – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. आ. शंकरराव गडाख यांनी आज सोनई येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते, याप्रसंगी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार शंकरराव गडाख यांचा सोनई येथे मोठा गुलाब पुष्पाचा हार घालून एकत्रित सत्कार करण्यात आला.

उद्धव ठाकरे

या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, जिल्हा काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील पटारे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण पिसाळ, तालुका कार्याध्यक्ष वसंतराव रोटे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब झावरे यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली व महाविकास आघाडीत काँग्रेसचे योगदान मोठे असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले, यावेळी विरोधी पक्ष नेते ना.अंबादासजी दानवे, मिलिंद नार्वेकर, विश्वासमामा गडाख, युवा नेते उदयन गडाख, गोकुळ भताने यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उद्धव ठाकरे
Share the Post:
error: Content is protected !!