ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

यश अकॅडमी

पोलीस अधीक्षक संदीप मिटकेंची प्रमुख उपस्थिती..

सोनई – मंगळवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मुळा एज्युकेश सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री उदयन गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने यश अकॅडमी सोनईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन मंगळ दि 12 फेब्रु 2024 रोजी करण्यात आले होते . प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके ,संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख , कार्यालय अधिक्षक जे बी . घुले , विश्वस्त भाऊसाहेब गवळी, प्राचार्य बाबासाहेब मुसमाडे उपस्थित होते.

याप्रसंगी संदीप मिटके म्हणाले अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम केले तर आपण जीवनात यशाची शिखरे गाठू शकतो जीवनात परिश्रम करणे आवश्यक आहे. यशाला शॉर्टकट नसतो विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुउपयोग करावा असे ते म्हणाले, दीक्षांत समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना रोपटे , गुलाबपुष्प , सन्मानपत्र देऊन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच मागील वर्षात इ . १० वीत प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व १०वी ला शिकविणाऱ्या शिक्षकवृंदांचा हस्ते सन्मान करण्यात आला .

यश अकॅडमी

विद्यार्थिनींनी बहारदार नृत्य सादर केले. विद्यालयाचे प्राचार्य अझर गोलंदाज यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला.उपप्राचार्य वैभव आढाव यांच्या हस्ते शपथ ग्रहण समारंभ झाला . या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पालकांचे औक्षण व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आभार असिफ बाबूलाल यांनी केले.

यश अकॅडमी
यश अकॅडमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यश अकॅडमी
यश अकॅडमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यश अकॅडमी
Share the Post:
error: Content is protected !!