ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

एकनाथ शिंदे

नेवासा – युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम उगले यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी नेवासा तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश देऊन करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत व त्यांच्या कार्यशैली विषयी प्रभावित होऊन मी व नेवासा तालुक्यातील असंख्य शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम उगले यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे

युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम उगले यांच्याबरोबरच सरपंच राहुल लकारे, उपसरपंच काकासाहेब खंडागळे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अक्षय काळे, युवा सेना विभाग प्रमुख अशपाक पठाण, युवा सेना गटप्रमुख अमोल पातारे, नितीन लहिरे, महेश बोरुडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांचा ठाणे येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, दीपक आगळे, स्वानंद जोशी, गजानन गवारे, गंगाधर रासने, पप्पू गोत्राणे, अरुण चव्हाण, चंद्रकांत गायकवाड, संजय दराडे आदी उपस्थित होते.

newasa news online
एकनाथ शिंदे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एकनाथ शिंदे
Share the Post:
error: Content is protected !!