ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अजित फाटके

नेवासा – महाराष्ट्राचे राजकारण मदाऱ्याच्या खेळाप्रमाने जनतेची करमणूक करत असून निव्वळ चिखलफेक करुन शेतकरी, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारीच्या प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली जात आहे. शिवछत्रपतींना अभिप्रेत रयतेचे राज्य अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, पंजाब नंतर महाराष्ट्रात स्थापन करण्याच्या ध्येयाने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन आम् आदमी पार्टीचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके यांनी केले.

आम् आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल फाटके यांचा नागरी सत्कार समारंभ गुरुवारी नेवासा नगर पंचायत चौकात संपन्न झाला. यावेळी आम् आदमी पार्टीच्या नेवासा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय मित्रपरिवाराने प्रचंड उत्साहात फाटके यांचे स्वागत करून पक्षाचे राज्य संघटन मंत्री संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला.

अजित फाटके

यावेळी बोलताना देसाई यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर घणाघात केला. नगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर काय रस्ते, काय गटारी, काय ती व्यवस्था, असे आपोआपच तोंडातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस ठाण्यात गोळीबार होऊ लागल्याने राज्याची कायदा सुव्यवस्था स्थिती स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व काही ओके आहे असे दाखविण्याचा राज्यकर्त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आपची सत्ता असलेल्या दिल्ली, पंजाब मध्ये शेतकऱ्यांच्या उसाला 3900 ते 4100 रुपये भाव दिला जात असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

newasa news online
अजित फाटके

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अजित फाटके
अजित फाटके

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अजित फाटके
Share the Post:
error: Content is protected !!