ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी

नेवासा – देर्डे – को-हाळे शिवार, ता. कोपरगांव परिसरात दरोड्याचे तयारीत असलेला मोक्क्याचे गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे 4 साथीदार 10,83,400/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद केले आहे , सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये सपोनि. हेमंत थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, विश्वास बेरड, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, अतुल लोटके, संतोष खैरे, विजय ठोंबरे, फुनकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

सदर सुचना प्रमाणे पथक आरोपींची माहिती काढत असताना सपोनि/श्री. हेमंत थोरात यांना दिनांक 15/02/24 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे मयुर उर्फ भुऱ्या गायकवाड रा. कोपरगांव हा त्याचे 06 ते 07 साथीदारासह 2 कारमधुन येवुन शिर्डी ते नाशिक जाणारे रोडवर, देर्डे फाट्याजवळ, साईनाथ शेर ए पंजाब हॉटेलजवळ, देर्डे – कोऱ्हाळे शिवारात दरोडा घालण्याचे तयारीत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, सपोनि/ थोरात यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता शिर्डी ते नाशिक जाणारे रोडवर, देर्डे फाट्याजवळ, साईनाथ शेर ए पंजाब हॉटेलजवळ, देर्डे – कोऱ्हाळे शिवारात रोडचे कडेला 2 चार चाकी गाड्या अंधारात लावुन काही इसम अंधारामध्ये बसलेले दिसुन आले.

त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने सदर ठिकाणी 23.00 वा. चे सुमारास अचानक छापा टाकताच दोन इसम पथकास पाहुन अंधारामध्ये पळुन गेले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळुन आले नाही. उर्वरीत अंधारात बसलेले संशयीत इसम पळण्याचे तयारीत असतांना त्यांना ताब्यात घेवुन, पथकाची ओळख समजावुन सांगुन सदर ठिकाणी थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे 1) मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड वय 21, रा. इंदिरानगर, ता. कोपरगांव, 2) अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे वय 20, रा. एकरुखे, ता. राहाता,

3) समाधान देविदास राठोड वय 23, रा. करंजीबोलकी, ता. कोपरगांव, 4) संदीप पुंजा बनकर वय 33, रा. द्वारकानगर रोड, शिर्डी, ता. राहाता व 5) उमेश तानाजी वायदंडे वय 27, रा. गणेशनगर, ता. राहाता असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस करता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे 6) गणेश भिकुनाथ तेलोरे रा. गणेशनगर, ता. राहाता (फरार) व 7) राहुल शिवाजी शिदोरे (फरार) रा. गोकुळनगर, कोपरगांव, ता. कोपरगांव असे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात 1 तलवार, 1 कटावणी, 1 कत्ती, 1 लाकडी दांडके, मिरचीपुड, 1 ऍ़पल व 3 विविध कंपनीचे मोबाईल फोन, 1 इर्टीगा व 1 वोल्क्सवॅगन कार असा एकुण 10,83,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 41/2024 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे मयुर ऊर्फ भु-या अनिल गायकवाड हा सराईत गुन्हेगार असुन तो अहमदनगर जिल्ह्यातील मोक्क्याचे गुन्ह्यात फरार आहे. त्यांचे विरुध्द खुनाचा प्रयत्न व जबरी चोरी प्रमाणे 3 गुन्हे दाखल आहे ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

 1. कोपरगाव शहर 231/2021 भादविक 327, 201, 34
 2. कोपरगाव शहर 384/2022 भादविक 307, 143, 147, 148
 3. राहुरी 641/2023 भादविक 394, 364 (अ), 341 (मोक्का) (फरार)

आरोपी नामे अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा तयारी, दरोडा व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 06 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

 1. लोणी 504/2022 भादविक 379, 34
 2. लोणी 76/2023 भादविक 395, 392, 120 (ब), 341
 3. आश्वी2 109/2023 भादविक 379, 201, 34
 4. संगमनेर शहर 10/2023 भादविक 379, 201, 34
 5. राहाता 484/2023 भादविक 307, 337 341, 323, 504, 506
 6. लोणी 266/2023 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25
  आरोपी नामे समाधान देविदास राठोड हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, अपहरण करुन जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

 1. संगमनेर तालुका 350/2021 भादविक 395, 120 ब, 201
 2. शिर्डी 78/2021 भादविक 395
 3. संगमनेर शहर 323/2022 भादविक 379
 4. संगमनेर तालुका 165/22 भादविक 397, 364 (अ), 384 आर्म अक्ट 3/25
 5. कोपरगाव शहर 22/2024 मपोका 124
आरोपी

आरोपी नामे उमेश तानाजी वायदंडे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुन, खुनाचा प्रयत्न व दरोडा असे गंभीर स्वरुपाचे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

 1. शिर्डी 569/2019 भादवि क 302, 120 (ब), 201
 2. शिर्डी 286/2020 भादविक 395, 341, 504
 3. घारगांव 404/2022 भादविक 307, 353, 332, 400, 34
 4. लोणी 76/2023 भादविक 392, 341, 34, 395, 120 (ब)
 5. राहाता 290/2023 भादविक 160, 427

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. वैभव कलुभर्मे , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा. शिरीष वमने साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी
Share the Post:
error: Content is protected !!