ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा – सोनई बेल्हेकरवाडी रस्त्यावरील धार्मिक प्रार्थनास्थळात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बलात्कार, विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उत्तम बळवंत वैरागर, संजय केरु वैरागर (दोघेही रा. सोनई), सुनील गुलाब गंगावणे (टिव्ही सेंटर अहमदनगर) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

डिसेंबर २३ ते १५ फेब्रुवारीपर्यंत सोनई बेल्हेकरवाडी रस्त्यावरील एका चर्चमध्ये फिर्यादीची मुलगी व भाचीवर आरोपी उत्तम वैरागर याने वेळोवेळी बलात्कार करुन लैंगिक शोषण केले. संजय वैरागर व सुनिल गंगावणे यांनी घरी येऊन तुमचा आजार बरा करतो, असे सांगत पाठीवरुन. हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असल्याचा फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीला पैसे व चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाल्यानंतर सोनई पोलीस ठाण्यात धाव घेतली रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना अटक करून कलम ३७६, ३५४ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके करत आहे.

गुन्हा
newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!