ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मनोहरनाथ बाबा

नेवासा – नेवासा शहराच्या पूर्वेस प्रवरानदीच्या तीरावर असलेल्या श्री क्षेत्र मध्यमेश्वर मंदिरात महंत ब्रम्हलिन योगी मनोहरनाथ बाबा यांची २३ वी पुण्यतिथी  मंदिराचे मठाधिपती महंत श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संतपूजन व कीर्तन सोहळयाने साजरी करण्यात आली. महंत योगी  मनोहरनाथ  बाबांच्या  पुण्यतिथीच्या निमित्ताने देवगड देवस्थानचे महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज यांच्या हस्ते योगी मनोहरनाथ बाबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

यावेळी सकाळी ९ वाजता बाबांच्या भक्त परिवारातील सेवेकरी रामनाथ महाराज पवार,विजय महाराज पवार रामभाऊ महाराज आढाव,दिनकर महाराज हारदे,संतसेवक गोपीनाथ महाराज कोरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योगी मनोहरनाथ बाबा यांच्या चरित्र ग्रंथाचे पारायण करण्यात आले.त्यानंतर पुनतगाव येथील बालयोगी महंत श्री दीपकनाथजी महाराज यांचे हरिकीर्तन झाले. यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रम प्रसंगी महंत विष्णूदेवानंद भारती,स्वामी रामानंद सरस्वती,मुकाई  आश्रमाचे प्रमुख महंत गोपालानंदगिरी महाराज,मुंबादेवी देवस्थानचे महंत बृहस्पतीनाथ महाराज,महंत योगी धर्मनाथ महाराज,महंत बाळकृष्ण महाराज,महंत पंचमपुरीजी महाराज,बालयोगी महंत विश्वनाथगिरीजी महाराज,स्वामी माधवानंदगिरी महाराज,महंत सुदर्शन नाथजी महाराज,महंत सीताराम महाराज,महंत भगवंतपुरीजी महाराज यांचे संतपूजन महंत ऋषिनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

संतपूजन सोहळयासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी योगदान दिले तर सोहळयासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान सत्काराद्वारे करण्यात आला.नाथपंथी महंत व वारकरी संप्रदायातील संत एकत्रित आल्याने हरि आणि हर यांचा मिलाप ही यावेळी पहावयास मिळाला. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, हभप कोंडीराम महाराज पेचे, अमृतानंद महाराज कांकरिया,ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,गायनाचार्य सचिन महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे,मध्यमेश्वर भक्त मंडळाचे सेवेकरी मुरलीधर कराळे,रामभाऊ जगताप,लक्ष्मण जगताप, रामभाऊ सुरोसे,अन्नदाते विलासभाऊ नांगरे, गायनाचार्य शंकर महाराज तनपूरे,दत्तात्रय गायकवाड,पिंटूभाऊ परदेशी, सचिन सावंत,गणेश कोरेकर यांच्यासह नाशिक भगूर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोहरनाथ बाबा

उपस्थित भाविकांना नाथभक्त विलासभाऊ नांगरे व परीवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद वाटपासाठी मध्यमेश्वर युवा प्रतिष्ठान, योगी  मनोहरनाथ बाबा भक्त मंडळ,किसनगिरी बाबा तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी झालेल्या संतपूजन सोहळयाचे सूत्रसंचालन केले तर महंत ऋषिनाथ महाराज यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.माऊलींच्या पसायदानाने पुण्यतिथी सोहळयाची सांगता करण्यात आली.

आमदार शंकरराव गडाख यांनी संतपूजन सोहळयासाठी मोठे योगदान दिले त्यांनी या सोहळयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

मनोहरनाथ बाबा
मनोहरनाथ बाबा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मनोहरनाथ बाबा
मनोहरनाथ बाबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मनोहरनाथ बाबा
Share the Post:
error: Content is protected !!