ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भजन

नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्चमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरिय भजन स्पर्धेचे बक्षिस वितरण थाटात संपन्न

नेवासा – नेवासा येथील कॅथोलिक आश्रमाच्या ज्ञानमाऊली चर्चमध्ये धर्मगुरु जॉन गुलदेवकर यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या नाशिक धर्मप्रातांचे पहिले महागुरुस्वामी स्व.बिशप थॉमस भालेराव एस.जे.यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरिय भजन स्पर्धेचे प्रथम बक्षिस २१ हजार रुपये वाघोली (ता.शेवगांव) येथील स्वर येशु भजनी मंडळाने पटकाले असून व्दितीय बक्षिस १४ हजार रुपये छञपती संभाजीनगर भजनी मंडळाने मिळविलेले अाहे तर ७ हजार रुपयांचे तृत्तीय बक्षिस मिरज (जि. सांगली) येथील सिनाई भजनी मंडळाने मिळविलेले आहे तर चतुर्थ बक्षिस सियोन भजनी मंडळी,देवळाली प्रवरा (ता.राहूरी) यांनी मिळविले असल्याची माहीती नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरु जॉन गुलदेवकर यांनी दिली.

नेवासा येथील कॅथोलिक आश्रमामध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरिय भजन स्पर्धेचे बक्षिस वितरण पुणे येथील पेपल सेमिनरी रेव्ह.फादर भाऊसाहेब संसारे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले यावेळी बोलतांना संसारे म्हणाले की,भजन या शब्दाचा अर्थ फार गहन आणि महान आहे.’भज’ म्हणजे देवाला स्मरणे,देवाचे नामस्करण करणे गायनातून देवाला आपलेसे करणे आणि भजनाने आत्मसमाधान मिळतो हे दाखवून देणे असे गोरोद्गारही यावेळी त्यांनी बक्षिस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले व यावेळी प्रभू येशू ख्रिस्तावर एक भजनही फादर संसारे यांनी गाऊन दाखवत उपस्थित भाविकांना मंञमुग्ध केले.

यावेळी बोलतांना डॉ.सुरेश पठारे यांनी आपल्या मनोगतातून आजच्या युगात तरुणांपेक्षा वयोवृध्द लोकच भजनाकडे आधिक आकर्षित होत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे अधिक वेळ वाया न घालवता या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या ज्ञानमाऊली चर्चला धन्यवाद दिले.या राज्यस्तरिय भजन स्पर्धेत उत्तेजनार्थ अनेक बक्षिसे ठेवण्यात आलेली होती यामध्ये उत्तम गायकचे बक्षिस नवलोक सेवा भजन मंडळी नेवासा फाटा,उत्तम पेटीवादकचा मान आराधना भजन मंडळ,दिग्रस (ता.राहूरी) तर उत्तम तबला वादकाचा मान स्वगीय साधना भजनी मंडळी,देवळाली प्रवरा, (ता. राहूरी) व उत्तम टाळ वादकाचा मान ख्रिस्त सुवार्ता भजनी मंडळी,देवगांव (ता. शेवगाव) यांनी मिळविला आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक फादर जॉन गुलदेवकर यांनी केले.

तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केस बोर्डे,विलास घोरपडे,उत्तम गायकवाड,संजय तुपे,वैभव मगर,प्रसाद वाघमारे,मधुकर कोल्हे,प्रभधर पाटोळे,राजु पवार,सदाभाऊ सोनवने,रवि पवार,योहान मोरे,एकनाथ बोर्डे,अविनाश गाढवे,राजेद्र पंडीत,राजु कांबळे,मच्छिंद्र गोरे,येशूदास शहाराव,शरद वंजारे,पप्पु कांबळे,डॅनियल कोल्हे,अक्षय बनसोडे,समाधान जाधव,राजू शिंगाडे,लक्ष्मण जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

भजन
भजन
भजन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भजन
भजन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भजन
Share the Post:
error: Content is protected !!