ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा –  व्हॉट्सअँप ग्रुपवर खोटी माहिती व्हायरल करून सार्वजनिक बदनामी केल्याच्या आरोपावरून कुकाणा माध्यमिक विद्यालयाचा शिक्षक रज्जाक निजाम इनामदार रा . कुकाणे याचे सह तिघा जणांवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात दोघा पोर्टल चालकांचाही समावेश आहे.  या प्रकरणी नेवासा फाटा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक सुनील गर्जे यांनी फिर्याद दाखल केली असून शिक्षक मित्र या नेवासा तालुक्यातील व्हॉट्स ॲप ग्रुप वर शिक्षक रज्जाक इनामदार याने खोटी माहिती प्रसारित करून सार्वजनिक बदनामी होईल असे कृत्य केले .

तसेच इतर दोघा पोर्टल चालकांनी फिर्यादीची बदनामी होईल अशी खोटी बातमी प्रसारित करून सार्वजनिक बदनामी केल्याचे नमूद केल्याने या आरोपावरून शिक्षक इनामदार याचे सह एकूण तिघा जणांवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नेवासा पोलिस पुढील तपास करत आहेत.

नेवासा तालुक्यातील प्राध्यापक (पत्रकार सुनील गर्जे )यांच्या विरोधात बदनामीकारक बातमी प्रसारित केल्याने नेवासा तालुक्यातील पत्रकार व प्राध्यापक संघटना आंदोलन करण्याचा तयारीत आहेत असे समजते. त्यामुळे पुढील काळात पोलिस प्रशासनाकडून वेट अँड वॉच ची भूमिका होते की? या प्रकरणी न्याय मिळतो. याकडे नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा
Share the Post:
error: Content is protected !!