ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उर्दू

नेवासा – नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बाल आनंद मेळयास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल थाटून खरेदी विक्रीद्वारे  व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले. नेवासा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांच्या हस्ते बाल आनंद मेळयाचे उदघाटन फीत कापून करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार, शिक्षक संजय शेळके,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हारुण जहागीरदार,सामाजिक कार्यकर्ते अनिल ताके,शरीफ शेख,इम्रान पटेल,शिक्षण विभागाचे विषय तज्ञ समी शेख,शिक्षक शकील खान सर,रौफ शेख,आयुब जहागिरदार,अफसर सय्यद,जावेद इनामदार,निसार पटेल,शफिक पटेल,निसार शेख,अनिस शेख,अलीम शेख,शोएब पठाण,शिक्षिका साजिदा बाजी,नसरीन बाजी,वाजेदा बाजी,नाजिया बाजी उपस्थित होते.

यावेळी आलेल्या मान्यवरांसह पालकांचे खान शकील सर यांनी स्वागत केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हारुण जहागिरदार यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.यावेळी झालेल्या बाल आनंद मेळाव्याच्या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी भेळ पुरी,भाजीपाला,विविध खाद्य पदार्थांची दुकाने थाटून पदार्थ विक्रीद्वारे व्यवहार ज्ञान आत्मसात केले.

याप्रसंगी उर्दू शाळेचे प्रांगण पालक विद्यार्थी यांच्या गर्दीने फुलून गेले होते.बाल आनंद मेळयामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात खऱ्या अर्थाने व्यवहार ज्ञानात भर पडली असल्याचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी झालेल्या बाल आनंद मेळ्यात विद्यार्थ्यांनी थाटलेल्या विविध स्टॉलची पहाणी उपस्थित मान्यवरांनी केली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.बाल आनंद मेळा यशस्वीतेसाठी शिक्षिका शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.

उर्दू
उर्दू
उर्दू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उर्दू
उर्दू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उर्दू
Share the Post:
error: Content is protected !!