ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

उत्कर्षा रूपवते

नेवासा – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सोनई येथील पीडित बालकांची व त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाला धीर देत, आश्वासित केले. तदनंतर ए.पी.आय मा. शेळके यांची सोनई पोलिस स्टेशनला भेट घेऊन पुढील प्रक्रियेबद्दल महत्वाच्या सूचना केल्या. माध्यमांशी बोलताना रुपवते म्हणाल्या, “बालिकांवर आणि महिलांवर होणारे असे आघात संतापजनक आहेत. पीडित कुटुंब अतिशय गरीब व हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे.

एकूणच सगळ्या घटनाक्रमामुळे हादरलेल्या दोन्ही बालिकांना लवकरात लवकर जिल्हा बाल कल्याण समिती पुढे नेण्याचे व संरक्षण देण्याचे गरजेचे आहे; शासनाच्या ज्या योजना लागू होऊ शकतात त्या त्वरित कार्यान्वित करण्याचे सूचना जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांची मानसिक स्थिती स्थिरावेपर्यंत आवश्यक ते समुपदेशन उपलब्ध करावे व त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारीसुद्धा शासनाने घ्यावे या सूचना करण्यात आल्या आहेत. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी पोलीस व न्याय प्रक्रिया जलद गतीने कराणे महत्वाचे आहे.”

दिवसेंदिवस महिलांवर व मुलींवर वाढत जाणाऱ्या अशा प्रकारांमुळे समाजाचे स्वास्थ्य कोलमडत असून असे प्रकार थांबावेत म्हणून प्रशासनाच्या सर्व विभागांनी व समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे अशी भावना यांनी व्यक्त केली.जिल्हा बालकल्याण समिती, पोलीस प्रशासन, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग यांचा समन्वय साधून पीडित बालिकांना न्याय मिळावा यासाठी महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करेल असेही त्या म्हणाल्या.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी मा. साळवे व मा. शिरसाठ हे उपस्थित होते.

newasa news online
उत्कर्षा रूपवते

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उत्कर्षा रूपवते
उत्कर्षा रूपवते

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उत्कर्षा रूपवते
    Share the Post:
    error: Content is protected !!