ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अजित काळे

नेवासा – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नेवासा तालुक्यातील बाभूळखेडे येथे ग्रामस्थांनी आयोजित केली होती. यामध्ये बाभुळखेडे येथील युवकांनी भव्य अशी रॅली काढली. बाभूळखेडे येथील जोडप्यांच्या हस्ते सायंकाळी महाआरती करण्यात आली. जागर शिव विचारांचा या अंतर्गत ॲड.अजित काळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्याना प्रसंगी त्यांनी छत्रपतींचे स्वराज्य व शेतकरी या विषयावर विचार व्यक्त केले. विचार मंचावर बोलताना ॲड.अजित काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवू शकतात, परंतु राज्यकर्ते लोकांनी छत्रपती हे सत्तेमध्ये येण्याचे साधन म्हणून राज्यकारभार करण्यात धन्यता मांडली.

समाजामध्ये जाती धर्म पंथ यामध्ये तेढ निर्माण करून छत्रपतींच्या नावाने मत मागितली आणि सत्तेची खुर्ची कायम राखण्यात धन्यता मानली. छत्रपतींच्या महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात मालक असलेला शेतकरी पुत्र नोकरीच्या मागे लागून गुलामीचे जीवन जगतो यातच आजच्या राजकीय पिढीने छत्रपतींच्या विचाराशी नाळ तोडल्याचे द्योतक आहे. छत्रपतींच्या साम्राज्यात शेतकऱ्याच्या गवताच्या देठालाही हात लागता कामा नये असे आदेश छत्रपतींनी काढले होते.या विपरीत शेतकऱ्याला लुटून शेतकऱ्याच्या मुलाला देशोधडीला लावण्याची महापाप सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांनी केले आहे.

शेतकऱ्याच्या मुलांनी राजकारण सोडून माझ्या शेतकरी बापाच्या घामाचे दाम मिळवण्यासाठी लढले पाहिजे जो पक्ष विरोधात बसतो त्याच पक्षाला शेतकऱ्याची काळजी असते सत्तेत गेल्यावर मात्र या गोष्टीचा विसर पडतो असे ते म्हणाले.शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे छत्रपती हे राजे होते शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था निर्माण करणारे राजे या उलट शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेचा फायदा दारू निर्मिती कारखान्याला करून देणारी शासन व्यवस्था शेतकऱ्यांची व्यवस्था निर्माण करू शकत नाही यासाठी शेतकरी पुत्रांनी समाज माध्यमावर येणारी गाणी व्हिडिओ हे न पाहता छत्रपतींचे विचार वाचावेत व अन्यायाच्या विरोधात आपले विचार व्यक्त करून शासन व्यवस्थेला जाब विचारावा.

राजकीय पक्ष कोणताही असो त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पुत्राला खतासाठी रांग लावावी लागते शासकीय नोकर शेतकऱ्याकडे न येता मदतीसाठी याचक बनवून शासनाच्या दारामध्ये उभा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले या सर्व बाबी शेतकऱ्यांना गुलामी कडे घेऊन जातात आणि म्हणून छत्रपतींचे विचार जीवनात अमलात आणल्यास ही शासन व्यवस्था उलथून टाकायला वेळ लागणार नाही. भारत देश महासत्तेचा स्वप्न पाहत असताना शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य कमी भावात हिसकावून घेऊन 82 टक्के लोक रेशनच्या धान्यावर जगतात हे फुकट वाटून देशातील नागरिकाची कष्ट करण्याची क्षमता कमी करून देशाला गुलामिकडे नेण्याचे महापाप आजची शासन व्यवस्था करत आहे हे मोठे दुर्दैव.

आज-काल समाज माध्यमातून छत्रपतींचे विचार फॉरवर्ड केले जातात परंतु अंमलबजावणीसाठी कोणीही पुढे येत नाही त्यामुळे मोबाईल हातात घेऊन छत्रपतींचे स्वराज्य येणार नाही तर पुस्तके वाचून छत्रपतींचे स्वराज्य त्यांचा मावळा बनवून आपल्याला सर्वांना आणावे लागेल हाच खरा छत्रपतींचा जन्मोत्सव ठरेल असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषणा देऊन युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी छत्रपतींना मानणारे बाभूळखेडे येथील युवक युवती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपतींच्या विचाराची पिढी घडावी यासाठी बाभुळखेडे येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती बद्दल विचार व्यक्त केले यामध्ये प्रारब्ध पांडुरंग औताडे,साई सुभाष औताडे, साक्षी सतीश विधाटे, निकिता पांडुरंग नवले या विद्यार्थ्यांचा प्रमुख वक्ते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अजित काळे
अजित काळे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अजित काळे
अजित काळे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अजित काळे
Share the Post:
error: Content is protected !!