ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शिवजयंती

नेवासा – तालुक्यातील मक्तापूर येथे रामराज्य स्वराज मित्र मंडळ, जय श्रीराम मित्र मंडळ व शिवसेना ठाकरे मित्र मंडळ यांच्या हस्ते शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली. मक्तापूर मध्ये यावेळी दिलीप महाराज बर्डे मराठा सुकाणु समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय कांगुणे, पोलीस पाटील अनिल लहारे, युवा नेते माऊली देवकाते, उपसरपंच गोरक्षनाथ बर्डे, मनोज झगरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले.

गणेश झगरे म्हणाले की मक्तापूर येथे दरवर्षी तारखेप्रमाणे शिवजयंती कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.यावर्षी मक्तापूर मध्ये संध्याकाळी दिलीप महाराज बर्डे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.तसेच तरी सर्व मावळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, घटनापती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन गावातील विकास कामाला सर्वांनी एकत्र येऊन कामाला हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.

ह.भ.प.दिलीप महाराज बर्डे, युवा नेते रोहित भाऊसाहेब वाकचौरे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय कांगुणे, सरपंच अनिल लहारे, गोरक्षनाथ बर्डे, विशाल बर्डे, राहुल जामदार, विशाल कर्डक, प्रदीप बर्डे, मनोज झगरे, आजिनाथ झगरे,मक्तापूरचे ग्रामसेवक दत्तात्रेय गर्जे, योगेश जामदार, अक्षय भागवत, योगेश गायकवाड, ज्येष्ठ नेते हरिभाऊ कोळेकर आदी मक्तापूर ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते.

newasa news online
शिवजयंती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती
Share the Post:
error: Content is protected !!