ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मोहिनीराज चषक

नेवासा – शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ज्ञानेश्वर महाविद्यालय शेजारील नामदेवनगर येथील भव्य पटांगणात करण्यात आले आहे. याबाबतीत आज नेवासा येथील मोहिनीराज मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आली त्यावेळीं मोहिनीराज यात्रा उत्सव समितीचे नंदकुमार पाटील, अभय शेठ गुगळे, संजय सुखदान, महेश मापारी, मनोज पारखे, नितीन खंडागळे, सतीश गायके, अनिल शिंदे, विनायक नळकांडे, जालू गवळी, जयदीप जामदार उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीत आयोजक कमिटी कडून बंटी वाघ, शैलेश दाणे, विकी कोकणे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे आयोजित स्पर्धेसाठी आ.शंकरराव गडाख यांच्या वतीने प्रथम बक्षिस  ५१०००, दुसरे बक्षिस धनंजय काळे, राजेंद्र काळे, कृष्णा परदेशी यांच्या वतीने ३१०००, तिसरे बक्षिस सुरज नांगरे, धनु काशीद यांच्या वतीने २१०००, चौथे बक्षिस अंकुश बंदिवान, राहुल थोरात यांच्या वतीने ११,००० ठेवण्यात आले आहे.

तर मा.सरपंच सतीश गायके यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्टचे सौजन्य सेवा फाउंडेशनचे निरंजन डहाळे, गणेश चिंधे यांनी दिले आहे. बेस्ट बॅट्समन साठी नवीन बॅट मनोज पारखे,बेस्ट बॉलर साठी लाईफ स्टाईल मेन्स वेअरचे बंटी वाघ यांच्या कडून शूज, फायनल मॅन ऑफ द मॅच साठी दत्ता काळे, प्रमोद चक्रनारायण यांच्या कडून ट्रॉफी सौजन्य, स्पर्धेसाठी बॉल सौजन्य साजीदभाई पठाण, मुन्नाभाई शेख, पाण्याच्या जारचे सौजन्य सचिन पठाडे तर स्टंप सौजन्य जगदंबा स्पोर्टचे किशोर पठाडे यांनी दिले आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी मोहिनीराज यात्रा उत्सव समितीच्या वतीने ट्रॉफी सौजन्य देण्यात आले आहे.

newasa news online
मोहिनीराज चषक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोहिनीराज चषक
मोहिनीराज चषक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोहिनीराज चषक
Share the Post:
error: Content is protected !!