ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बैलगाडा

प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष ‘गोल्डमॅन’ पंढरीशेठ फडके यांचं निधन झालं आहे. यामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.आज दुपारच्या सुमारास ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. त्याच्या निधनाने पनवेलमध्ये शोकाकूल वातावरण आहे.

मुळचे पनवेलचे असलेले पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यत शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांची हटके एन्ट्री असायची गाडीच्या टपावर बसून शर्यत बागायची आणि बैल नजरेत बसला की त्याला विकत घेणारा ‘बैल’ मालक म्हणून पंढरीशेठ प्रसिद्ध होते.

बैलगाडा

पंढरीशेठ यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज होती. पंढरीशेठ जिथे असतील तिथे गर्दी आपोआप जमायची. पंढरीशेठ यांच्या हटके डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पंढरीशेठ यांच्यावर बरीच गाणी देखील बनली होती. लोकप्रिय असलेल्या पंढरीशेठ यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बैलगाडा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बैलगाडा
बैलगाडा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बैलगाडा
Share the Post:
error: Content is protected !!