ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जनआक्रोश मोर्चा

नेवासा तालुका बंद करू नका मात्र सर्वांनी मोर्चात उपस्थित रहावे – सकल हिंदू समाजाचे आवाहन.

नेवासा – तालुक्यातील सोनई येथील बेल्हेकरवाडी रोड वरील विनियाड चर्च मध्ये दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेच्या निषेधार्थ नेवासा शहरात तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या घटनेचा निषेध नोंदवुन या नराधमांना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी तसेच हिंदु समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना धर्मांतरित करत असलेल्या समाजातील वाईट प्रवृत्तीचा शोध घेवुन त्यांची चौकशी करण्यात यावी व त्यासाठी धर्मांतरण कायदा व्हावा, लव जिहाद सारखे विषयांवर कायदा पारित व्हावा, गोवंश हत्या थांबवण्यात याव्या व वक्फ बोर्ड सारखे बेकायदेशीर व संविधानीक रित्या बेकायदेशीर असलेले कायदे रदद व्हावेत म्हणुन नेवाशात २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता सकल हिंदू समाजाचे वतीने हिंदु जन आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

नेवासा तालुका बंद ठेऊन तालुक्यातील व्यापाऱ्यांचे नुकसान व नेवासा शहरातील मोहिनीराज महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाजापेठेवर परिणाम होऊ नये म्हणून तालुक्यातील सकल हिंदू समाजाने नेवासा तालुका बंद चा निर्णय मागे घेऊन सर्व बांधवानी जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

newasa news online
जनआक्रोश मोर्चा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनआक्रोश मोर्चा
जनआक्रोश मोर्चा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनआक्रोश मोर्चा
Share the Post:
error: Content is protected !!