ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आग

अहमदनगर जिल्हयातील शोरूमला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागण्याची घटना घडली. भीषण आगीत साडेपाच लाख रुपये रोख रकमेसह १५ नवीन दुचाकी जाळून खाक झाल्या आहेत.

अकोले शहरातील होंडा शोरूमला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागण्याची घटना घडली. भीषण आगीत साडेपाच लाख रुपये रोख रकमेसह १५ नवीन दुचाकी जाळून खाक झाल्या. अहमदनगर जिल्हयातील अकोले शहरातील राजेंद्र होंडा शोरूमला ही आग लागली होती. या आगीत कार्यालयही जाळून खाक झाले. ही घटना बुधवारी (दि. २१) पहाटे सहा वाजता घडली. याबाबत व्यवस्थापक विनोद वाकचौरे यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, बुधवारी पहाटे लागलेल्या आगीबाबत तेथील पी. डी. आय. सुपरवायझर अशोक भांगरे यांनी अकोले येथील योगेश देशमुख यांच्या फोनचा संदर्भ देऊन शोरूमला आग लागल्याचे सांगितले.

त्यानुसार नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना फोनवरून घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पाठवण्यास सांगितले, तसेच याबाबत शोरूमचे मालक ओंकार सोमाणी व कैलास सोमाणी यांना घटनेची माहिती दिली. या घटनेत शोरूममधील सर्व फर्निचर, संगणक, प्रिंटर, लॅपटॉप व इतर कार्यालयीन सामग्रीसह १५ दुचाक्यांचे काही पूर्णपणे तर काहींचे अंशतः नुकसान झाले. ज्या ठिकाणी आगीची घटना घडली ते ठिकाण लोकवस्तीत स्वतंत्र जागेत आहे. या परिसरात गॅरेज तसेच मंगल कार्यालय आहे. दिवसा येथे मोठी वर्दळ असते. या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे सुदैवाने हानी पोहोचली नाही. पहाटेची वेळ असल्यामुळे फारशी वर्दळही नव्हती.

आग लागल्याचे लक्षात आल्याने तात्काळ अग्निशामक बंब दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. सुदैवाने शेजारी हानी पोहोचली नाही. परंतु या आगीमध्ये आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. या आगीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

आग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आग
आग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आग
Share the Post:
error: Content is protected !!