ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

विद्यालय

सलाबतपुर – नेवासा तालुक्यातील लोकनेते मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गोगलगाव येथे असलेल्या सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये आज दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे पिताश्री ह .भ .प दिनकर महाराज मते हे होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील मते हे होते .

तसेच कार्यक्रमाच्या मंचावरती अनिलराव मते लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी कल्याणराव मस्के ,तसेच नारायणराव मस्के ,वसंतराव आगळे ,वसंतराव शिंदे, हाडोळे मामा ,उपसरपंच खेडले, काजळी, शाळे व्यवस्थापन समितीचे गळीम येथील उपाध्यक्ष सुनीलराव कोहक, बबनराव शेळके, ज्ञानेश्वर मते ,तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या शाळेच्या मुख्याध्यापिका भागुबाई शंकर महाजन मॅडम यावेळी उपस्थित होत्या.


याप्रसंगी अनिलराव मते बोलताना म्हणाले की आपल्या करिअरमध्ये गणित विज्ञान आणि इंग्लिश हे तीन विषयातील महत्त्वाचे असून यावर जास्तीत जास्त भर देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे तसे हे तीन विषय करिअर घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ते संबोधित करताना म्हणाले की प्रश्नपत्रिका आपल्या हातामध्ये पडल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये पहिली प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून घेतली पाहिजे त्यानंतर महत्त्वाचे सोपे सोपे प्रश्न पहिले सोडवले गेले पाहिजे त्यानंतर अवघड प्रश्नावरती मंथन करून विचारपूर्वक पेपर सोडवला तर नक्कीच जास्तीत जास्त मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकतील असे सुचक मार्गदर्शन अनिलराव मते यांनी विद्यार्थ्यांना केले.

या निरोप समारंभ प्रसंगी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मते बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जी काही शिदोरी लागते ती शिदोरी ही सर्व गुरुजनांनी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही इमोशनल होऊन ह्या जगाच्या बाहेर जातात तेव्हा या माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षणाच्या आधारे जगाच्या संकटाचा सामना करायचा असून तुमची परिस्थिती कशीही असली तरी तुम्हाला सुधारण्यासाठी शिक्षण हे सर्वोत्तम साधन आहे मी जितकी उच्चशिक्षित होईल तेवढे तुमचे स्वतःचे आणि पालकाचे, शाळेचे तसेच गुरुजनांचे नावलौकिक कराल बाल वयातील संस्कारांमध्ये शिक्षकांचा 80 टक्के वाटा असतो शाळेच्या माध्यमातून तुम्हाला गणित, विज्ञान ,इतिहास, समाजशास्त्र, कोणी शिकवले हे तुम्ही कधीही विसरू शकत नाही हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या पालकांना तसेच आपल्या घरच्या कामांमध्येही सहकार्य करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प दिनकर महाराज मते हे बोलताना म्हणाले की शिक्षक हे नेहमी मुलांना वळण देण्याचे काम करत असतात तशाच पद्धतीने आज सुदामरावजी मते पाटील विद्यालयातील शिक्षक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेले आहे. यावेळी ह भ प दिनकर महाराज मते अभ्यासाचे महत्त्व सांगताना म्हणाले की अभ्यासाने आतापर्यंत आपल्या देशातील अंतरापर्यंत लोक पोहोचले आहेत अभ्यासाने समुद्र पार करता आलेला आहे. अभ्यासाने आपल्याला जीवनामधील हवे ते प्राप्त करून घेता येते सर्वात महत्त्वाचा अभ्यास असून तसेच विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्यात गुरुजन मंडळीचे महत्त्वाचा वाटा आहे तसेच गुरुजन मंडळी मुळे समाज घडवण्यासाठी मोठी मदत होत असते तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की दहावीनंतर आपण कोणत्या क्षेत्रात गेले पाहिजे याचाही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणं गरजेचे आहे.

तसेच या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका महाजन मॅडम बोलताना म्हणाल्या की आपण परीक्षेला सामोरे जात असताना जे काही यश अपयश असते त्याला आपल्याला सामोरे जावे लागते त्यामध्ये कधी यशही आपल्याला हुलकावणी देत असते आपण अथक परिश्रम घेतले तर आपल्याला यश हे नक्कीच मिळते त्या माध्यमातून आपण थॉमस एडिशन सारखा इतिहास आपण या यशाच्या माध्यमातून घडवू शकतो ‌.

तसेच पुढे जात असताना अनेक नवीन क्षितिजे आपल्याला दिसणार आहेत तसेच या दहावी नंतर आपल्याला विविध प्रकारचे कौशल्य आपल्याला हस्तगत करायचे असून कारण आजचे युग आहे ते स्पर्धेचे युग असून प्रचंड स्पर्धा या जगामध्ये वाढलेली आहेत स्पर्धेच्या युगामध्ये जाताना आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकायचे आहे तसेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानाला पुढील काळात सामोरे जायचे आहेत. आपली शाळा ही एक घरटे आहे आज आपल्याला घरटे सोडून बाहेर जायचे असून आपल्याला वाईट वाटते ही जाणीव या ठिकाणी मला आहे.

शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचे एक नाते निर्माण झालेली असते ते नाते सोडून आपल्याला जायचे असते दुःख खूप होते परंतु दुःख होत असले तरी भविष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात त्या म्हणजे संस्कार,नम्रता, सल्लागार ,जिद्द, संस्कार म्हणजे आई-वडिलांनी केलेले संस्कार, नम्रता म्हणजे लोखंडाला वितळल्यानंतर योग्य जो आकार दिला जातो तो नम्रतेने मिळतो. इतरांशी वागताना नम्रतेने लागले पाहिजे, तिसरा सल्ला त्यांनी दिला की , विजय हा पाच पांडवाचा महाभारतामध्ये होतो परंतु त्यांना सल्ला देणारे श्रीकृष्ण होते म्हणून त्यांचा विजय झाला आणि कौरवांना सल्ला देणारे शकुनी मामा होते म्हणून त्यांचा पराजय झाला त्यामुळे सल्लागार योग्य असावा.

तसेच जिद्दीचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की एखादे ध्येय प्राप्त करायचे असले तर मनामध्ये आपल्याला जिद्द असायला हवी हे चार सूत्र मनामध्ये ठेवली तर तुमचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या प्रस्तावित पर भाषणातून बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका भागुबाई शंकर महाजन मॅडम म्हणाल्या.तसेच या कार्यक्रम प्रसंगी सरस्वती मातेचे तसेच स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील, तसेच स्वर्गीय सुदामरावजी मते पाटील यांचे प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या पण संख्येने उपस्थित होते.

विद्यालय
विद्यालय

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विद्यालय
विद्यालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विद्यालय
Share the Post:
error: Content is protected !!