ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

लक्ष्मणराव मोहिटे

नेवासा फाटा – नेवासा तालुका भारतीय जनता पक्षाची तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी जाहीर केली असुन भानसहिवरे येथील भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा नेते लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांची तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. मोहिटे हे जवळपास वीस वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.तसेच त्यांच्यावर पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये सुद्धा सदस्य म्हणून संधी मिळाली आहे.त्यांनी आतापर्यंत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, किसान मोर्चा जिल्हा सचिव तसेच युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे.

जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे माध्यमातून भानसहिवरे पंचक्रोशीत त्यांचे फार मोठे सामाजिक योगदान आहे.एक लढवय्या कार्यकर्ता अशी त्यांची तालुक्यात ओळख आहे.त्यांच्या निवडीमुळे निच्शितच भानसहिवरे परिसरातील पक्षाची ताकद वाढणार आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, माऊली पेच, विश्वास काळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

newasa news online
लक्ष्मणराव मोहिटे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लक्ष्मणराव मोहिटे
लक्ष्मणराव मोहिटे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लक्ष्मणराव मोहिटे
Share the Post:
error: Content is protected !!