ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

संजीवन ग्रुप

नेवासा – तालुक्यामध्ये सेवानिवृत्त प्राचार्य उपप्राचार्य तसेच मुख्याध्यापक व माध्यमिक अध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांचा संजीवन ग्रुप कार्यरत आहे या ग्रुप मध्ये सुमारे शंभर सक्रिय सभासद आहेत या ग्रुप मार्फत विविध सामाजिक शैक्षणिक तसेच विविध उपक्रम प्रत्येक महिन्याला केले जातात या महिन्यातील मीटिंग श्रीक्षेत्र देवगड येथे पार पडली.

त्याप्रसंगी प्राचार्य तथा मुख्याध्यापक जनार्दन चिंधे सर यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून तालुक्यात सुरू असलेल्या फिरते मोफत वाचनालय पुस्तक आपल्या भेटीला या उपक्रमासाठी ज्ञानेश्वरी पवित्र ग्रंथ 21 पारायण प्रती अंदाजे किंमत 3000 रुपये सस्नेह भेट दिल्या. प्राध्यापक जनार्दन चिंधे यांच्याकडून सदरचे ग्रंथ माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे व शब्दगंध परिषदेचे नेवासा शाखा उपाध्यक्ष दिगंबर गोंधळी यांनी स्वीकारले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुपचे मानद अध्यक्ष साहेबराव भनगे होते.

क्षेत्र देवगड येथील भक्त निवास सभामंडपात झालेल्या कार्यक्रमास प्राचार्य रघुनाथ आगळे, उपप्राचार्य भैय्यासाहेब देशमुख, प्राचार्य दत्तात्रेय आघाव, एस आर शिंदे सर, माजी अध्यक्ष अध्यापक रामदास कोरडे, प्राचार्य गणगे व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अध्यापक राम कर्जुले यांनी कार्यक्रम गौरवास्पद असून ऋणनिर्देश व्यक्त केले.

संजीवन ग्रुप
संजीवन ग्रुप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संजीवन ग्रुप
संजीवन ग्रुप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संजीवन ग्रुप
Share the Post:
error: Content is protected !!