ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी


नेवासाफाटा – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील गणेश भूतकर खून प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश बानकर यास तब्बल पाच वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून जामिन मंजूर झाला आहे. याप्रकरणात इतर सहा संशयित आरोपी या अगोदरच पासूनच जामिनावर आहेत.

शनिशिंगणापूर येथील गणेश भूतकर याची २०१७ मध्ये जुन्या भांडणातून हत्या झाली होती. याप्रकरणी शनीशिंगणापूर पोलिसांत संशयित आरोपी अविनाश बानकर सह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अविनाश बानकर याच्यासह इतर आरोपींवर खुनासह विविध कलमन्वे खटला चालवला जात आहे.

जामीन

सदर खटल्यामधे नियमित जामिन मिळावा यासाठी मुख्य संशयित आरोपी अविनाश बानकर याने औरंगाबाद खंडपीठात ऑक्टोबर 2023 रोजी जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु सदरचा जामिन अर्ज फेटाळण्यात आल्याने सदर आदेशा विरोधात बानकर याने सर्वोच्चा न्यायलय (नवी दिल्ली ) येथे विशेष राजा याचिका दाखल करुण आव्हान दिले होते. सदर याचिकेच्या अपील समर्थनासाठी अपीलकर्त्याच्या वकिलांनी असे सादर केले आहे की अपीलकर्ता पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे.

2019 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते आणि फिर्यादीच्या ३५ साक्षीदारांपैकी आजपर्यंत फक्त दोन साक्षीदार तपासले गेले आहेत. केवळ याच आधारावर सर्वोच्च न्यायालयाने सहआरोपी भाऊराव आणि लखन उर्फ लक्ष्मण यांना 2023 मध्ये जामीन मंजूर केला आहे. तसेच सहआरोपीही जामिनावर असल्याचे त्यांनी सादर केले. त्याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मुख्य संशयीत आरोपी अविनाश चांगदेव बानकर यास जामीन मंजूर केला.
आपिलार्थी बानकर यांच्या साठी जेष्ठ विधिज्ञ सुदांशू चौधरी, विधिज्ञ ऋचा पांडे तसेच नेवासा येथील प्रसिद्ध विधिज्ञ ऍड. रोहित रविंद्र जोशी यांनी काम पाहिले.

जामीन
जामीन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जामीन
जामीन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जामीन
Share the Post:
error: Content is protected !!