ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दशक्रिया विधी

नेवासा – मागील वर्षी 2022-23 अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या व इतर पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते परंतु बिनकामाच्या तहसीलदार साहेब यांच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिले होते.वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी जीवन ज्योत फाउंडेशनने वंचित शेतकऱ्यांना सोबत घेऊन दोन वेळेस आंदोलन केलेले आहे.

दोन वेळेस आंदोलन केले तेव्हा कुठे झोपलेल्या कर्तबगार तहसीलदार साहेबांना जाग आली आणि तालुक्यातील 22 गावातील शेतकर्यांचे यादी मध्ये नाव आले.सदर यादी मध्ये शेतकर्यांचे नावे आले, शेतकऱ्यांनी के.वाय.सी करून 25 दिवस उलटुन गेले परंतु नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम खरच मिळणार आहे का असा मोठा प्रश्न पडला आहे.जर येत्या आठ दिवसात उर्वरित शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाई रक्कम तहसीलदार साहेबांनी तातडीने संबंधितांच्या बँक खात्यात जमा करून योग्य ते पावले उचलावीत अन्यथा नाविलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने भेंडा येथे सकाळी तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी आंदोलन करण्यात येईल.व त्याच दिवशी माननीय तहसील साहेब यांचे पीढ दान करून आंदोलन करण्यात येईल.

काही अनुचित प्रकार घडला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर त्याला संबंधित शासकीय यंत्रणा आणि त्या विभागातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले या वेळी शेतकरी जनआंदोलक कमलेश नवले पाटील,छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,आप्पासाहेब आरगडे,जैद शेख,अक्षय बोधक,प्रदिप आरगडे,राहुल कांगुणे,अक्षय आरगडे,अभिजीत बोधक,प्रकाश मुळक,प्रदिप जाधव,बाबासाहेब चामुटे,संभाजी आरगडे यांच्यासह अनेक शेतकरी व सहकारी उपस्थित होते.

दशक्रिया विधी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दशक्रिया विधी
दशक्रिया विधी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दशक्रिया विधी
Share the Post:
error: Content is protected !!