ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आनंद मेळावा

नेवासा : शहरातील जिल्हा परिषद नेवासा मुली शाळेतील विद्यार्थिनींचा शनिवारी बाल आनंद मेळावा‎ घेण्यात आला.यामध्ये तब्बल १०५ विद्यार्थिनींनी सहभाग घेत विविध पदार्थांचे स्टॉल लावले. आनंद मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पाणीपुरी,‎ भेळ,समोसा, वडापाव, इडली,‎ मसाला पापड, भजे,पॅटिस यासह खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच पालेभाज्या व फळांचे स्टॉल लावले होते. या आनंद बाजाराचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गव्हाणे,उपाध्यक्षा सोनाली पाटील,मुख्याध्यापिका नंदा गवळी यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने आनंद मेळाव्याचे आयोजन केले असून विद्यार्थीनींना ‘कमवा‎ व शिका’ याची जाणीव होण्यासह‎ विविध व्यवसाय व व्यवहाराची‎ माहिती व्हावी,यासाठी हा बाल‎ आनंद मेळावा घेण्यात असल्याचे प्रतिपादन मुख्याधापिका नंदा गवळी यांनी केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या वर्षा पठाडे, ॲड.दीपक गायकवाड,संदीप बोरकर,सुनील व्यवहारे, ॲड.शादाब शेख,सुहास पठाडे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. शिक्षका वैशाली कुलट,मनीषा जवणे,ज्योती बोरूडे,वर्षा जगताप,विजय साळुंके,सुधाकर झिने यांनी परिश्रम घेतले.

newasa news online
आनंद मेळावा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आनंद मेळावा
आनंद मेळावा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आनंद मेळावा
Share the Post:
error: Content is protected !!