ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

विधानसभा

नेवासा – महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील विधानसभेच्या २५२ मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे, २२२ शेवगाव विधानसभा मतदार संघाच्या निरिक्षक पदी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

या निवडीबद्दल अभिजीत लुणिया यांचे महाराष्ट्राचे माजी महसुल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात,आ.लहुजी कानडे, माजी आ. डॉ सुधीर तांबे,आ.सत्यजीत तांबे,महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ.वजाहत मिर्झा,काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ,समन्वयक ज्ञानदेव वाफारे,काँग्रेस अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी अभिनंदन केले आहे.

विधानसभा
विधानसभा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विधानसभा
विधानसभा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विधानसभा
Share the Post:
error: Content is protected !!