ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ग्रामसेवक

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सतीश मोटे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मुक्तचव प्रदान करण्यात आला. नेवासा तालुक्यातील भालगाव येथे कार्यरत असतांना गावपातळीवर केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीवर आधारित सन २०१८ /१९ चा जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्का नुकताच २२ फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते व आशिष येरेवार मुख्यकार्यकारी अधिकारी जि प अहमदनगर, सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी अहमदनगर, दादासाहेब गुंजाळ उपमुख्यकार्यकारी व जिल्हा परिषद अधिकारी पदाधिकारी यांचे उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

सतिश मोटे यांनी आपले कार्यकाळात भालगाव,पुनतगाव ग्रामपंचायत मधे शासकीय योजना तसेच गोरगरीब घटकापर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचवन्याचं काम केलं. गावाचा सर्वांगीण विकास करण्यात त्यांचा हातखंडा आहे. स्वतः चे वडाळा बहिरोबा गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. ग्रामविकासा बरोबर धार्मिक क्षेत्रात सुद्धा मोलाची कामगिरी बजावत असतात. भैरवनाथ देवस्थानच्या कालभैरवनाथ जयंती उत्सव मध्ये सहभागी होऊन देवस्थानच्या विकासासाठी प्रयनशील असतात.गावाच्या विकासाबरोबरच ग्रामसेवक संघटनेत एकनाथ ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली काम करत असताना श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्षपद, नेवासा तालुका संघटना अध्यक्षपद समर्थपणे सांभाळून ग्रामसेवकांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्नशील असतात.

सध्या ते अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची पतसंस्था अहमदनगर चे संचालक असुन सभासदांना वेळेत कर्जपुरवठा व संस्था बळकटीकरण करण्यासाठी उत्कृष्टपणे कामकाज करत आहेत.त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल पुनतगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन वाकचौरे,उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी तसेच दै सार्वमतचे पत्रकार अशोक तुवर,दै लोकमतचे पत्रकार रमेश शिंदे,ग्रामपंचायत कर्मचारी वसीम शेख,बापूसाहेब लांडगे यांनी अभिनंदन केले आहे.

ग्रामसेवक
ग्रामसेवक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ग्रामसेवक
ग्रामसेवक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ग्रामसेवक
Share the Post:
error: Content is protected !!