ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रास्ता रोको
रास्ता रोको

नेवासा – तालुक्यातील मक्तापूर गावात मराठा आरक्षणासाठी ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे यासाठी अंतरवली सराटी येथे मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सकल मराठा समाजच्या वतीने गणेश झगरे यांनी मक्तापूर येथे आंदोलन केले.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, वंचित आघाडी, मल्हार सेनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.यावेळी उपस्थिती मराठा सुकाणु समिती प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, सरपंच सुशीला लहारे, पोलीस पाटील अनिल लहारे,

तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, राहुल जामदार, दीपक शिंदे श, आजिनाथ जामदार, सचिन जामदार, मनोज झगरे, योगेश कांगुणे, योगेश गायकवाड राहुल लहारे, दीपक बर्डे आदी मक्तापुर ग्रामस्थ उपस्थित होते.झगरे म्हणाले की मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अनेक दिवसापासून उपोषण केले जात आहे.पण सत्ताधारी पक्षांनी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे.मराठा समाजाला सगेसोयरे यांना ही आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे.त्यांना पाठिंबा देण्यासाठी मक्तापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असे झगरे म्हटले.

newasa news online
रास्ता रोको

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रास्ता रोको
रास्ता रोको

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रास्ता रोको
Share the Post:
error: Content is protected !!